सौरवदादा म्हणजे दंतकथा -रणबीर

तु झुठी मै मक्कारचे तिसरे गाणे व्हायरल झाल्यावर आता चित्रपटाच्या प्रमोशनची गडबड सुरू आहे. यात मुख्य भूमिका असलेल्या रणबीर कपूरच्या खांद्यावर प्रमोशनची मुख्य धुरा असून त्यासाठी त्याने चंडीगढनंतर कोलकाताला नुकतीच भेट दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 28 Feb 2023
  • 07:37 am
सौरवदादा म्हणजे दंतकथा -रणबीर

सौरवदादा म्हणजे दंतकथा -रणबीर

तु   झुठी मै मक्कारचे तिसरे गाणे व्हायरल झाल्यावर आता चित्रपटाच्या प्रमोशनची गडबड सुरू आहे. यात मुख्य भूमिका असलेल्या रणबीर कपूरच्या खांद्यावर प्रमोशनची मुख्य धुरा असून त्यासाठी त्याने चंडीगढनंतर कोलकाताला नुकतीच भेट दिली. 

या वेळी एका कार्यक्रमात त्याने आपण सौरव गांगुलीच्या जीवनावरील चित्रपटात भूमिका स्वीकारली असल्याच्या अफवेचे खंडन केले. त्या वेळी रणबीर म्हणाला की, माझ्या दृष्टीने सौरवदादा एक देशातील नव्हे तर जगातील जिवंत दंतकथा आहे. त्याच्या जीवनावरील चित्रपट एक विशेष घटना असेल आणि त्यात मला भूमिका करायला नक्कीच आवडेल. मात्र, दुर्दैवाने तशी काही ऑफर माझ्यापर्यंत आलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे या चित्रपटाचे निर्माते लव्ह फिल्मस यांच्याकडून पटकथा निर्मिती अजून सुरू आहे.  

या वेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सौरव गांगुलीही उपस्थित होता. त्याने आणि रणबीरने तु झुठी मै मक्कार असे नाव असलेले टी शर्ट घातलेले होते. एडन गार्डनवर झालेल्या कार्यक्रमावेळी दोघांनीही फोटोग्राफरना हव्या तेवढ्या पोझ दिल्या. 

तु झुठी मै मक्कारमध्ये रणबीरच्या बरोबर श्रद्धा कपूर नायिकेच्या भूमिकेत असेल. टी सेरीजचे भूषणकुमार हा चित्रपट सादर करत असून त्याची निर्मिती लव्ह फिल्मचे रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे तर दिग्दर्शन लव्ह रंजनने केले आहे. होळीच्या मुहूर्तावर म्हणजे आणखी एका आठवड्याने चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.         

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story