‘शैतान’ सुसाट

अजय देवगण आणि माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘शैतान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 11 Mar 2024
  • 12:41 pm
 'Satan'Susat

‘शैतान’ सुसाट

 इंडस्ट्री ट्रॅकर ‘स्कॅनलिंक’च्या अहवालानुसार, या सुपरनॅचरल भयपटाने पहिल्या दिवशी १५ कोटी २१ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘शैतान’ला रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक म्हणजे ४३.०२ टक्के व्यवसाय मिळाला. त्याची एकूण व्याप्ती २५.७० टक्के इतकी होती. याशिवाय दुसऱ्या दिवशी आगाऊ बुकिंगद्वारे १ लाख ९५ हजार तिकिटांची विक्री करून चित्रपटाने ४ कोटी ९० लाख रुपयांची कमाई निश्चित केली आहे.

यासह, हा अजयच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. या यादीत अजय आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'सिंघम रिटर्न्स' पहिल्या क्रमांकावर आहे. अजयच्या चित्रपटाला ३२.०९ कोटींची ओपनिंग मिळाली होती. 'शैतान'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले असून त्यात दक्षिणेतील अभिनेत्री ज्योतिकाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. गुजराती अभिनेत्री जानकी बोडीवालाने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

दुसरीकडे, आमिर खानच्या बॅनरखाली बनलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट ८ दिवसांनंतरदेखील १० कोटींचा आकडा पार करू शकला नाही. या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी केवळ ६० लाखांचा व्यवसाय केला. यासह त्याचे भारतातील कलेक्शन ६ कोटी ८० लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहिले आहे. 'लपता लेडीज' चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली असून त्याचे दिग्दर्शन त्याची माजी दुसरी पत्नी किरण राव हिने केले आहे.

याशिवाय यामी गौतम स्टारर 'आर्टिकल ३७०'ने १५व्या दिवशी चांगली कमाई केली. या चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी १ कोटी ६५ लाखांचा व्यवसाय केला. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ३५ कोटी ६० लाख रुपये आणि दुसऱ्या वीकेंडला २२ कोटी ३० लाख रुपये कमावले. यासह या 'आर्टिकल ३७०'ने आतापर्यंत एकूण ५९ कोटी ८५ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामीशिवाय अरुण आणि प्रियामणीही 'आर्टिकल ३७०'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या तीन बॉलिवूड चित्रपटांसोबतच टिमोथी चालमेट आणि झेंडया यांच्या प्रमुख भूमिका असलेला हॉलिवूड चित्रपट ‘ड्यून-२’देखील प्रदर्शित झाला आहे. 'स्पायडरमॅन' फेम अभिनेत्री झेंडयाच्या ‘डून-२'नेही भारतात चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात १६ कोटी ५५ लाख रुपये कमावले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story