‘सरफिरा’साठी समोसे

अक्षयकुमारच्या 'सरफिरा'ची बॉक्स ऑफिसवर फारच खराब ओपनिंग झाली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची खराब कामगिरी लक्षात घेऊन एका मल्टिप्लेक्सने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर दिली आहे. आता लोकांना चित्रपटाच्या तिकिटासह चहा आणि दोन समोसे मोफत मिळणार आहेत. तीन दिवसांत या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ ११.८५ कोटी रुपये झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 16 Jul 2024
  • 01:00 pm
bollywood, akshay kumar, Sarfira, new movie, box office, poor performance, multiplex, cinema

संग्रहित छायाचित्र

अक्षयकुमारच्या 'सरफिरा'ची बॉक्स ऑफिसवर फारच खराब ओपनिंग झाली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची खराब कामगिरी लक्षात घेऊन एका मल्टिप्लेक्सने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर दिली आहे. आता लोकांना चित्रपटाच्या तिकिटासह चहा आणि दोन समोसे मोफत मिळणार आहेत. तीन दिवसांत या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ ११.८५ कोटी रुपये झाले आहे.

‘आयनाॅक्स मुव्हीज’ने आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले आहे, ‘‘तुमची भूक ‘सरफिरा’ कॉम्बोने दूर करा. या यम्मी कॉम्बोमध्ये दोन समोसे आणि चहा आहे. शिवाय तुमच्या ऑर्डरसोबत एक फ्री मर्केंडाइज टॅग येईल.’’

सुधा कोंगारा दिग्दर्शित अक्षचा 'सरफिरा' हा ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपट 'सूरराई पोटरू'चा अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट तमिळमध्ये चांगलाच गाजला होता. मात्र हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धडपडत आहे.
 हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला. याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे अडीच कोटी रुपये होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सुमारे ७० टक्क्यांनी वाढ होऊन ते ४.२५ कोटींवर गेले. सोमवारी (दि. १५) सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रविवारी बॉक्स ऑफिस कलेक्शन ५.१० कोटी रुपये होते. म्हणजेच तीन दिवसांचे एकत्रित बॉक्स ऑफिस कलेक्शन ११.८५ कोटी रुपये झाले आहे.

अक्षय हा असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षात चार चित्रपट प्रदर्शित होतात. त्याच्या शेवटच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली आणि त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले गेले. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने एका वर्षात चार चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, अमिताभ बच्चन यांनी सल्ला दिला होता की, नेहमी काम केले पाहिजे.

यावर एका मुलाखतीत अक्षय म्हणाला, ‘‘मी एका वर्षात चार चित्रपट का करतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. लोकांना याचा त्रास का होतो, हे समजत नाही. मी दोन वर्षात एखादा चित्रपट केला तर तो यशस्वी होईलच याची शाश्वती काय? हिंदीत वर्षभरात सुमारे २०० चित्रपट बनतात. दक्षिणेतही अनेक चित्रपट बनतात. प्रत्येकाला काम आहे. बच्चन साहेबांनी शक्यतोपर्यंत काम थांबवू नका असा सल्ला दिला होता. नेहमी काम करत राहावं हे मी त्यांच्याकडून शिकलो.’’  

अक्षयने बिग बींसोबत 'वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम', 'खाकी', 'आंखे', 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' आणि 'एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story