Samantha Married! : समांथा मॅरीड !

समांथा रुथ प्रभूने ३६ व्या वर्षांत पदार्पण केले असून त्यानिमित्त तिच्या आगामी कुशी या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक विशेष पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये समांथा एक सुखी विवाहिता दाखवली असून त्यात गळ्यात तिने मंगळसूत्र घातलेले दाखवले आहे.नागा चैतन्यसमेवत विवाहबद्ध झालेली समांथा सध्या त्याच्यापासून दूर झालेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 02:37 pm
समांथा मॅरीड !

समांथा मॅरीड !

समांथा रुथ प्रभूने ३६ व्या वर्षांत पदार्पण केले असून त्यानिमित्त तिच्या आगामी कुशी या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक विशेष पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये समांथा एक सुखी विवाहिता दाखवली असून त्यात गळ्यात तिने मंगळसूत्र घातलेले दाखवले आहे.नागा चैतन्यसमेवत विवाहबद्ध झालेली समांथा सध्या त्याच्यापासून दूर झालेली आहे. कुशीतील नायक विजय देवरकोंडानेही एक पोस्टर शेअर केले असून सोबत दिलेल्या शुभेच्छामध्ये त्याने हॅपी बर्थ डे बरोबर लाल रंगाची इमोजी टाकली आहे. 

कुशीमधील समांथाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये तिने टाईट फीट जीनसमवते साधा कुर्ता घातलेला आहे. गळ्यात मंगळसूत्र घातलेली समांथा यात विजय देवरकोंडाची प्रेमिका बनलेली आहे. साधेपणा आणि सौंदर्यांचा मिलाप तिच्या व्यक्तीमत्त्वात दिसत असून सुहास्य वदनाने एका गल्लीतून गळ्यातील लॅपटॉपसह ती जात असल्याचे पाहावयास मिळते.

हे पोस्टर शेअर करताना कुशीचे निर्माते लिहतात की, ्# कुशीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा @ समांथा प्रभू २ तुझ्यासमवेत असलेल्या सौख्य आणि प्रेमळ भावना आसपासच्या वातावरणात पसरत राहू दे. समांथाने या शुभेच्छाबद्दल चित्रपटाच्या टीमचे आणि देवरकोंडाचे आभार मानले आहेत. विजय देवरकोंडाबरोबरचा कुशी हा समांथाचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांचा २०१८ मध्ये महंती हा चित्रपट आलेला होता. कुशीमध्ये या दोघांची अनोखी केमिस्ट्री पाहावयास मिळणार असून त्यातील गाणी अगोदरच  हिट झाली आहेत. गेल्या वर्षी शेअर केलेले टायटल पोस्टर आणि गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेला होता. हा चित्रपट शिवा निर्वाना याने दिग्दर्शित केलेला आहे. ही एक वेगळ्या जॉनरची प्रेमकथा असून त्यामध्ये जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेन्नेला किशोर, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार आणि सरण्ण्या यांची भूमिका आहेत.समांता सध्या सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तिच्यासमवेत वरुण धवन नायकाच्या भूमिकेत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story