रश्मिका सोबत साखरपुडा,लग्न... छे छे; विजय देवरकोंडाचा धक्कादायक खुलासा
साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाने हाॅट अभिनेत्री रश्मिका मंदानासोबतच्या (Rashmika Mandana) लग्नाच्या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपासून तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)आणि रश्मिका मंदाना यांच्या एंगेजमेंटच्या अफवा चर्चेत होत्या. अफवांनुसार, विजय आणि रश्मिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एंगेजमेंट करू शकतात. अशा परिस्थितीत विजयने आता या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. तो म्हणाला, ‘‘मी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करणार नाही आणि लवकर लग्नही करणार नाही. काही माध्यमांच्या लोकांना दर दोन वर्षांनी माझे लग्न लावून द्यावे, असे वाटते. ही अफवा मी दरवर्षी ऐकतो.’’
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' या चित्रपटात विजय आणि रश्मिका एकत्र दिसले होते. यानंतर २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'डियर कॉम्रेड' या चित्रपटातही हे दोघे एकत्र दिसले होते. या चित्रपटातील विजय-रश्मिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दोघांच्याही चाहत्यांना खूप आवडली होती. चित्रपटाच्या सेटवरून असे वृत्त आले होते की दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, दोन्ही कलाकार याबद्दल कधीही उघडपणे बोलले नाही.
दिवाळीनिमित्त विजय देवरकोंडाने त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये रश्मिकानेही हजेरी लावली होती. या दोघांचे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो समोर आल्यापासून त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यातच नोव्हेंबरमध्ये रश्मिका विमानतळावर हुडी परिधान करताना दिसली होती. विजयने काही वेळेपूर्वी असाच हुडी घातला होता. ही हुडी विजयच्या राऊडी या ब्रँडची होती. याशिवाय दोघांनीही गेल्या वर्षी मालदीवमध्ये एकत्र सुट्टी घालवली होती. विजय आणि रश्मिका अलीकडेदेखील व्हिएतनाममध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसले. असे असले तरी विजयने लग्न तसेच साखरपुडा यावरील बातम्यांना अफवा ठरवले आहे.
रश्मिका सध्या ‘अॅनिमल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिची रणबीर कपूरसोबत प्रमुख भूमिका होती. आगामी काळात रश्मिकाचे तीन तेलुगु आणि एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ती 'पुष्पा २: द रुल', 'रेनबो' आणि 'द गर्लफ्रेंड' तसेच 'छावा' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. विजयबद्दल बोलायचे तर तो साउथ चित्रपट 'फॅमिली स्टार' आणि 'व्हीडी-१६' या चित्रपटांत झळकणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.