'सैराट'ला सात वर्षे पूर्ण; आकाश ठोसर झाला भावूक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. समाजाचे धगधगते वास्तव या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. अभिनेता आकाश ठोसर व अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’मधून मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते. या चित्रपटातील परशा व आर्चीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:34 pm
'सैराट'ला सात वर्षे पूर्ण; आकाश ठोसर झाला भावूक

'सैराट'ला सात वर्षे पूर्ण; आकाश ठोसर झाला भावूक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. समाजाचे धगधगते वास्तव या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. अभिनेता आकाश ठोसर व अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’मधून मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते. या चित्रपटातील परशा व आर्चीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती.

‘सैराट’ चित्रपटाने आकाश व रिंकूला लोकप्रियता मिळवून दिली. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने ते प्रसिद्धीझोतात आले. आजही प्रेक्षक परशा व आर्चीवर तितकंच प्रेम करतात. २९ एप्रिल २०१६ साली ‘सैराट’ सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्रामवरून खास पोस्ट शेअर केली आहे.

आकाशने ‘सैराट’ चित्रपटाचं पोस्टर त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. “सैराटला सात वर्ष पूर्ण झाली,” अशी कॅप्शन आकाशने या पोस्टला दिली आहे. आकाशच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. “अजूनही चित्रपट थिएटरला लागला, तर आधीसारखी गर्दी होईल, ” अशी कमेंट केली आहे, तर कित्येकांनी “पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहावासा वाटतो, ” असेही म्हटले आहे.

‘सैराट’मुळे घराघरात पोहोचलेल्या आकाशने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’मध्येही तो दिसला होता. त्याचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story