सईचा ‘तो’ अनुभव

चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचे अनुभव येतात. सिनेमामध्ये काम हवे असेल तर तडजोड करावी लागेल, असे म्हटले जाते. खासकरून नवख्या अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला काम मिळवायचे असेल तर अशा ऑफर दिल्या जातात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 1 Jul 2024
  • 04:18 pm
Entertainment news, sai tamhankar

संग्रहित छायाचित्र

चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचे अनुभव येतात. सिनेमामध्ये काम हवे असेल तर तडजोड करावी लागेल, असे म्हटले जाते.  खासकरून नवख्या अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला काम मिळवायचे असेल तर अशा ऑफर दिल्या जातात. आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचे धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. हिंदीसह मराठीमध्ये आपल्या अभिनयाने कामाचा ठसा उमटवणारी सई ताम्हणकरला कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आले.  सई ताम्हणकर गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिने फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मराठी व हिंदी प्रेक्षकांची चाहती सईला कास्टिंग काउचसंदर्भात एक फोन आला होता, तो प्रसंग तिनेच सांगितला आहे.

एका मुलाखतीत सईला कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आले,  तेव्हा तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. सई म्हणाली, खूप आधी मला एक फोन आला होता. अशी अशी भूमिका आहे, पण तुला या लोकांबरोबर झोपावे लागेल. मी त्याला म्हटले की हा मेसेज तू तुझ्या आईला फॉरवर्ड कर. तुझ्या बाबालाही पाठव. मला पुन्हा कधीच फोन किंवा मेसेज करू नकोस. १५-२० वर्षांत पहिल्यांदा आणि एकदाच असे घडले होते. त्यावेळी कोण बसून काय मेसेज करतोय याची पडताळणी करणेही खूप कठीण होते. अजूनही आपल्याला माहीत नसते की मेसेज करते ती व्यक्ती कोण आहे, असे सई ताम्हणकर म्हणाली.

सईला एकदा बसने प्रवास करताना वाईट अनुभव आला होता, तो प्रसंगही तिने सांगितला. सई सांगलीहून मुंबईला येत होती. त्यावेळी बसमध्ये तिच्या पाठीमागे बसलेल्या एका मुलाने तिचा दंड पकडला होता. यामुळे घाबरलेल्या सईने त्याचा हात पकडून पिरगाळला होता आणि त्याला दम दिला होता. सईच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती ‘मटका किंग’ सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story