रिचाची भरारी!

अभिनेत्री रिचा चढ्ढा आंतरराष्ट्रीय पदार्पणास सज्ज झाली असून इंडो-ब्रिट प्रॉडक्शनच्या ‘आयना’ साठी ती करारबद्ध झाली. हा चित्रपट अधिकृतरित्या लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्डमध्ये फ्लोअरवर गेला. अर्थात, रिचाचा हा काही पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 19 May 2023
  • 08:55 am
रिचाची भरारी!

रिचाची भरारी!

अभिनेत्री रिचा चढ्ढा आंतरराष्ट्रीय पदार्पणास सज्ज झाली असून इंडो-ब्रिट प्रॉडक्शनच्या ‘आयना’ साठी ती करारबद्ध झाली. हा चित्रपट अधिकृतरित्या लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्डमध्ये फ्लोअरवर गेला. अर्थात, रिचाचा हा काही पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट नाही. यापूर्वी तिने इंडो-फ्रेंच मासानमध्ये काम केले होते. यातील तिच्या अभिनयाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. शिवाय हॉलिवूडमधील एका भारतीयाच्या जीवनावरील लव्ह सोनिया चित्रपटात काम केले होते. सध्याचा तिचा आयना या चित्रपटाची कथा भारत आणि लंडनमध्ये घडते. रिचाच्या अभिनय कारकिर्दीवर आयना चित्रपट एक मानदंड ठरणार आहे. या चित्रपटात रिचा ब्रिटिश अभिनेता विल्यम मोसेलीसमवेत काम करत आहे. ‘आयना’ ची अधिकृत घोषणा हाऊस ऑफ लॉर्डमध्ये करण्यात आली तेव्हा ब्रिटनचे मान्यवर मंत्री, संसद सदस्य, चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आदी हजर होते. चित्रपटाचे दिग्दर्शन मार्कुस मीड्तने केले आहे. युद्धातील हिंसाचाराचा मनुष्यावर आणि समाजावर कसा दीर्घकालीन परिणाम होतो यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे.      

चित्रपटाबद्दल रिचा म्हणाली की, जगाच्या एका नव्या भागात काम करताना खूप आनंद झाला. त्यातच कोणताही प्रयोग करताना मी मागे हटत नाही. भारत आणि ब्रिटनमधील सर्वोत्तम तंत्रज्ञ आणि कलाकारांची निवड करून एका महत्त्वाच्या सामाजिक घटनेवर गंभीर भाष्य केले आहे. लंडनमध्ये सध्या आम्ही चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत आहोत. चित्रपटाचे शूटिंग २ जून रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. मला आव्हाने झेलण्यास आवडतात. या चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी एक आव्हान आहे. विल्यम मोसेली ब्रिटनमधील नामवंत अभिनेते असून गाजलेल्या नरिना चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ या भारतीय चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन घडवले होते. इंग्लंडमधील बिग कॅट फिल्म्स आणि गिता भल्ला, पी. जे. सिंग हे एकत्रितपणे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. रिचा झी च्या नर्स मनज्योत आणि फुक्रे ३ मध्ये काम करत आहे. तसेच संजय लिला भन्साळीच्या हिरामंडीमध्येही रिचाच्या अभिनयाचे आपणाला दर्शन घडणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story