रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’!

अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झुठी, मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवला आहे. या चित्रपटानंतर लवकरच रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ या बहुचर्चित चित्रपटात रणबीर कपूरबरोबर साऊथची सेन्सेशन आणि साऱ्या भारताची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना काम करत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 12 Jun 2023
  • 03:43 pm
रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’!

रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’!

अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झुठी, मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवला आहे. या चित्रपटानंतर लवकरच रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ या  बहुचर्चित चित्रपटात रणबीर कपूरबरोबर साऊथची सेन्सेशन आणि साऱ्या भारताची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना काम करत आहे. शिवाय बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. गेले कित्येक दिवस चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असून त्याच्या प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

घोषणा केल्याप्रमाणे या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये फारसे काही दाखवले नसले तरी रणबीरचा जबरदस्त ॲक्शनचा अंदाज यात बघायला मिळणार आहे. ११ जून रोजी म्हणजे रविवारी ११ वाजून ११ मिनिटांनी हा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या व्हीडीओमध्ये रणबीर कपूरच्या हातात कुऱ्हाड असून तो काही मुखवटा घातलेल्या लोकांना  कुऱ्हाडीने मारत असल्याचे दिसते. तो एका हाताने कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करताना दिसत आहे. रणबीरने यामध्ये पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. हा व्हीडीओ आणि यातील हिंसा पाहता रणबीर एका शक्तिशाली गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळेल असा अंदाज आहे. रणबीर या लोकांना मारत असताना एक पंजाबी गाणंदेखील आपल्याला ऐकायला मिळते.

एकूणच या टीझरमध्येच एवढी हिंसा पाहायला मिळत असेल तर संपूर्ण चित्रपटात नेमकं काय काय पाहायला मिळेल याची कल्पना करता येईल. हा केवळ ॲक्शनचा आणि हिंसक मारामारीचा चित्रपट असणार आहे हे नावावरूनच लक्षात येते. अ‍ॅनिमल हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट तयार केला असून तो जगभरात प्रदर्शित होईल. रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चित्रपटाबरोबर सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा गदर २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या दोन चित्रपटांच्या आमने-सामने होणाऱ्या प्रदर्शनात कोण बाजी मारतो हे लवकरच कळेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story