Rajinikanth : रजनीकांत मुंबईत!

सुपरस्टार रजनीकांतची काही उपाधी लावून ओळख करून देण्याची गरज नाही. थलाविया नावाने ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांतचे दक्षिण भारतातच नव्हे तर साऱ्या देशांत मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. १९७५ ला चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या रजनीकांतने अल्पावधीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आपले स्थान निर्माण केले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत दरारा असलेल्या रजनीकांतने बॉलिवूडमध्येही काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 8 May 2023
  • 10:07 am
रजनीकांत मुंबईत!

रजनीकांत मुंबईत!

सुपरस्टार रजनीकांतची काही उपाधी लावून ओळख करून देण्याची गरज नाही. थलाविया नावाने ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांतचे दक्षिण भारतातच नव्हे तर साऱ्या देशांत मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. १९७५ ला चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या रजनीकांतने अल्पावधीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आपले स्थान निर्माण केले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत दरारा असलेल्या रजनीकांतने बॉलिवूडमध्येही काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रविवारी सकाळी रजनीकांत मुंबई विमानतळावर आल्याचे अनेकांनी पाहिले. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात त्याने आपले वाहन गाठले. त्याने एक साधा निळा टी शर्ट आणि करड्या रंगाची पँट घातलेली होती. पापाराझ्झी त्याचे फोटो काढत असताना त्याने त्यांच्याकडे सुहास्य मुद्रेने पाहिले. त्याची कन्या ऐश्वर्या निर्माण करत असलेल्या लाल सलाम चित्रपटाच्या शूटिंगसाठी रजनीकांत मुंबईत आला आहे. त्याच्या आगमनाच्या व्हायरल व्हीडीओची सोशल मीडियावरील चाहत्यांनी तातडीने दखल घेतली आहे. एक चाहता म्हणतो की, थलावरचे चालणे पाहा. थलावर नेहमीसारखे चालत आला तरी ती एक स्टाईल असते.      

 रजनीकांत त्याच्या जेलर या आगामी चित्रपटात मुथुवेल पंडियन या जेलरची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या टीझरवरून हा एक ॲक्शनपॅक्ड चित्रपट वाटतो. चित्रपटाच्या मुख्य भागाचे शूटिंग हैदराबाद आणि केरळमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रजनीकांत आणि अभिनेत्री रामया कृष्णन २३ वर्षांनंतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. जेलर १० ऑगस्टला जगभरातील चित्रपटगृहात झळकणार आहे. चित्रपटात रजनीकांत समवेत साऊथचा आणखी एक मेगास्टार मोहनलाल आहे. या दोघांशिवाय शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, रामया कृष्णन आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. सन पिक्चर्सने तयार केलेल्या अन्नाथ्थी चित्रपटात रजनीकांत या अगोदर दिसला होता. यात किर्थी सुरेश, नयनतारा, खुशबू, जगपथी बाबू यांच्या भूमिका होत्या.    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story