'राधे माँ'च्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

'राधे माँ' चा मुलगा हरजिंदर सिंह कलाविश्वात पदार्पण करत आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये हरजिंदर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून हरजिंदरने 'ओटीटी'बरोबरच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 19 May 2023
  • 01:48 am

'राधे माँ'च्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

'राधे माँ' चा मुलगा हरजिंदर सिंह कलाविश्वात पदार्पण करत आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये हरजिंदर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून हरजिंदरने 'ओटीटी'बरोबरच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

हरजिंदर या वेबसीरिजमध्ये एसटीएफ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणदीप हुडाबरोबर त्याने या सीरिजमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. “इन्स्पेक्टर अविनाश एक चांगली वेबसीरिज आहे. या सीरिजमध्ये मी तरुण पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्ह्यांसाठी त्याची पोलिसांत भरती करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरीने छाप पाडू इच्छिणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत मी आहे,” असे हरजिंदर म्हणाला.

“मला विविधांगी भूमिका साकारायच्या आहेत. केवळ सेलिब्रिटी नाही, तर मला उत्तम कलाकार व्हायचे आहे. मी एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. माझी स्वप्ने साकार करण्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. जर अभिनय क्षेत्रात माझे करिअर झाले नाही, तर मी व्यवसाय करीन,” असेही पुढे हरजिंदर म्हणाला. हरजिंदरची ही वेबसीरिज १८ मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे.

दरम्यान, 'राधे माँ' अशी ओळख मिळवलेल्या सुखविंदर कौरने १७ व्या वर्षी मोहनसिंह यांच्याबरोबर लग्न केले. त्यांना हरजिंदर व भूपेंद्र ही दोन मुले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story