प्रभास तर जोकरच दिसत होता : अर्शद वारसी

अभिनेता प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन, प्रभास यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

Prabhas, Kalki 2898 AD, Movie release, June, Amitabh Bachchan, Deepika Padukone, Kamal Haasan, Box office hit, Film success, Star cast

File Photo

अभिनेता प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन, प्रभास यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अर्शद वारसीने या चित्रपटाबाबत आपले स्पष्ट मत मांडले होते.

त्याने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाविषयी नाराजी व्यक्त करत प्रभासवर टीका केली होती. “प्रभास तर या चित्रपटात जोकर दिसत होता, असे अर्शद म्हणाला होता. यानंतर प्रभासच्या चाहत्यांकडून अर्शदवर जोरदार टीका झाली होती. इतकेच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता अर्शदने प्रतिक्रिया दिली आहे.  नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अर्शद या वादावर मोकळेपणे व्यक्त झाला.

तो म्हणाला, प्रत्येकाला एक दृष्टीकोन असतो आणि लोकांना आपापला अर्थ लावायला आवडते. मी त्या भूमिकेविषयी बोललो होतो, व्यक्तीविषयी नाही. तो (प्रभास) प्रतिभावान कलाकार आहे आणि त्याने स्वत:ला पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे. हे आपल्याला माहीत आहे. पण जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कलाकाराला वाईट भूमिका देतो, तेव्हा प्रेक्षकांसाठी ते निराशाजनक ठरते.

मी कल्की हा चित्रपट पाहिला, पण मला तर तो अजिबात आवडला नाही. अमितजींचे काम अप्रतिम होते. मी त्यांना समजूच शकत नाही. त्या व्यक्तीकडे जी ताकद आहे, ती आपल्याला मिळाली ना, तर आयुष्य कमालीचे होईल. ते खरे आहेत असे वाटतच नाही. पण प्रभास, मी खरेच खूप निराश झालो आहे. तो असा का.. तो जोकरसारखा दिसत होता. का? मला मॅड मॅक्स पहायचा आहे. मला तिथे मेल गिब्सनला पहायचे आहे. तुम्ही त्याला काय बनवले यार? असे तुम्ही का करता? मला समजत नाही, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story