Parineeti-Raghav : परिणीती-राघव यांचा साखरपुडा १३ मेला

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या विवाहाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. परिणीती व राघव यांना अनेकदा एकत्र विविध ठिकाणी माध्यम प्रतिनिधींनी 'स्पॉट'ही केले आहे. मात्र, आता त्यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली असून, साखरपुडा १३ मे रोजी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 04:32 pm

परिणीती-राघव यांचा साखरपुडा १३ मेला

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या विवाहाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. परिणीती व राघव यांना अनेकदा एकत्र विविध ठिकाणी माध्यम प्रतिनिधींनी 'स्पॉट'ही केले आहे. मात्र, आता त्यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली असून, साखरपुडा १३ मे रोजी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली आहे. १३ मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार आहे. सध्या परिणीती व राघव दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. साखरपुड्यानंतर थोड्याच काळात ते विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती परिणीती व राघव चड्ढा यांच्याकडून मिळालेली नाही, पण ते दोघे पुढील सहा महिन्यांत म्हणजेच २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काही दिवसांपूर्वी परिणीतीचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हीडीओत तिच्या हातात अंगठी दिसत होती. तिच्या हातातील अंगठी पाहून परिणीती आणि राघव यांनी गुपचूप साखरपुडा केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परिणीती चोप्राची बहीण व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवरच ती भारतात आल्याचे बोलले जात होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story