Atomic bomb : ‘ओपनहायमर’ उलगडणार अणूबॉम्बच्या निर्मितीचा प्रवास

अणूबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या आगामी ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नोलनच्या या चित्रपटाची चर्चा खूप आधीपासून सुरू होती. शिवाय याआधी आणखी एक छोटा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता, पण हा नवा ट्रेलर कथानकाबद्दल अधिक विस्तृत माहिती देतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 9 May 2023
  • 04:06 pm

‘ओपनहायमर’ उलगडणार अणूबॉम्बच्या निर्मितीचा प्रवास

अणूबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या आगामीओपनहायमरया चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नोलनच्या या चित्रपटाची चर्चा खूप आधीपासून सुरू होती. शिवाय याआधी आणखी एक छोटा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता, पण हा नवा ट्रेलर कथानकाबद्दल अधिक विस्तृत माहिती देतो.

नोलन या चित्रपटाच्या माध्यमातून ओपनहायमर या शास्त्रज्ञाची कथा सांगणार आहे. ओपनहायमर हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनीमॅनहॅटन प्रोजेक्टमध्येही योगदान दिलं आहे. यामुळेच त्यांना अणूबॉम्बचा जनक मानले जाते. ट्रेलरमध्ये ओपनहायमर हे अणूबॉम्ब बनवण्यासाठी घेत असलेले कष्ट, त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय तणाव, वैज्ञानिकांसमोर उभी असलेली वेगवेगळी आव्हाने, तसेच त्या वैज्ञानिकांचं खासगी आयुष्य हे सगळे आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. कशा रीतीने हा अणुबॉम्ब बनवण्यासाठी तयारी करण्यात आली अन् त्याचा मनुष्याने कसा वापर केला अन् त्यातून निर्माण झालेला विध्वंस हा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

ट्रेलरच्या शेवटी जग ज्यासाठी तयारच नव्हतं अशी असामान्य शक्ती मानवाच्या हाती सुपूर्द करणाऱ्या ओपनहायमर यांना जबाबदार ठरवून समाजातून होणाऱ्या त्रासाचा सामना करताना दाखवलं आहे. या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका किलियन मर्फी साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून नेहमीप्रमाणेच नोलनने लोकांना चकित केलं आहे. हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story