katrina kaif : आता कॅटदेखील...; बॉलिवूड सेलिब्रेटींची उडाली झोप

एआयच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या डीपफेक व्हीडीओमुळे बॉलिवूड सेलिब्रेटींची झोप उडाली आाहे. रश्मिका मंदाना, प्रियांका चोप्रा, काजोल, आलिया भट, नोरा फतेही यांच्यानंतर आता कॅटरिना कैफदेखील (katrina kaif) डीपफेक व्हीडीओच्या (Deepfake video) कचाट्यात सापडली आहे.

katrina kaif

आता कॅटदेखील...; बॉलिवूड सेलिब्रेटींची उडाली झोप

एआयच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या डीपफेक व्हीडीओमुळे बॉलिवूड सेलिब्रेटींची झोप उडाली आाहे. रश्मिका मंदाना, प्रियांका चोप्रा, काजोल, आलिया भट, नोरा फतेही यांच्यानंतर आता कॅटरिना कैफदेखील (katrina kaif)  डीपफेक व्हीडीओच्या (Deepfake video)  कचाट्यात सापडली आहे.

बाॅलिवूडमध्ये डीपफेक व्हीडीओचा पहिला फटका रश्मिकाला बसला. याप्रकरणी तिच्या समर्थनार्थ बाॅलिवूड एकवटले. नंतरमात्र एकापाठोपाठ अनेक स्टार्सना याचा फटका बसला.त्यात आता कॅटचाही समावेश झाल्याने तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. तिचा हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर डीपफेकबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून डीपफेकचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर संबंधित दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी असे आवाहन बॉलिवूडमधील सेलिब्रेटींकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने या प्रकाराला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली होती. ज्याने रश्मिकाचा डीपफेक व्हीडीओ बनवला, त्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बाॅलिवूडमधील अबायटम साॅंग स्पेशालिस्ट नोरा फतेही अलीकडेच डीपफेकची शिकार ठरली होती. नोरानं जेव्हा तिचा डीपफेक व्हीडीओ पाहिला तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी तिनं तातडीने समोर येतव्हीडीओमधील ‘ती मी नव्हेच,’ असे सांगितले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचादेखील डीपफेक व्हीडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.  

कॅटरिनाच्या डीपफेक व्हीडीओमध्ये ती सफाईनं तुर्की भाषा बोलताना दिसत आहे. मुळात हा व्हीडीओ २०१४ मधील आहे. त्यावेळी कतरिना आणि ऋतिक रोशनचा ‘बँग बँग’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा व्हीडीओ त्या चित्रपटाच्या प्रमोशनचा आहे. कतरिनाच्या त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘‘कतरिना जर तुर्की भाषा बोलत असती तर कसे वाटले असते...’’ असे नमूद करीत त्यानंतर एक वैधानिक सूचना या फेक व्हीडीओसोबत दिली आहे. हा व्हीडीओ आर्टिफिशयल इंटेलिजन्सनं तयार केला असून त्याच्या डीपफेक टूल्सच्या माध्यमातून त्यानं अनेकांना त्रस्त केल्याचे त्यात म्हटले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story