आता जावं लागेल लग्नाला!

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश व नीता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Thu, 11 Jul 2024
  • 04:12 pm
Ambani's wedding

आता जावं लागेल लग्नाला!

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश व नीता अंबानींचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. १२ जुलैला अनंत-राधिकाचे हिंदू पद्धतीने लग्न होणार असून ८ जुलैला दोघांना हळद लागली. सध्या देशातच नव्हे तर जगभरात अनंत-राधिकाच्या शाही लग्नसोहळ्याची चर्चा सुरू आहे. या बहुचर्चित अशा लग्नाची पत्रिका एका मराठी अभिनेत्याला देण्यात आली आहे. याचा फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला असून “आता जावं लागेल लग्नाला” असे लिहिले आहे.

जुलै महिना सुरू होताच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ, गरबा नाईट, संगीत सोहळा, ग्रह शांती पूजा आणि हळदी समारंभ हे कार्यक्रम झाले असून दोघांच्या लग्नाला अवघे दोन दिवस बाकी आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्याला अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका पोहोचली आहे.सध्या मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘चारचौघी’ नाटकातला अभिनेता श्रेयस राजेला मुकेश अंबानींकडून मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यात आली आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “आता जावं लागेल लग्नाला!,” असे  त्याने फोटोवर लिहिले आहे. तसेच श्रेयसने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका कशी त्याच्यापर्यंत पोहोचली याविषयी लिहिले आहे.

श्रेयसने लग्नाच्या पत्रिकेचा फोटो शेअर करत लिहिले आहे, “तर ही दस्तूरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉइंट केला होता. जो वांद्र्याहून घोडबंदरपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला. क्रेझी मॅनेजमेंट.”  दरम्यान, श्रेयसने बऱ्याच एकांकिका, नाटक, मालिका, वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘जिगरबाज’, ‘भेटी लागी जीवा’, ‘ती परत आलीये’ या मालिकांमध्ये श्रेयसने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. सध्या तो चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटकात काम करत आहे. या नाटकात श्रेयसबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, पार्थ केतकर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story