Miss you! : मिस यू !

ऋषी कपूर या जगातून जाऊन आज तीन वर्षे झाली असली तरीही ते आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयात वास्तव्य करून आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अकस्मात निधनाचा साऱ्यांना मोठा धक्का बसला होता. ३० एप्रिल २०२० रोजी बॉलिवूडच्या रोमान्स किंगने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 01:42 pm
मिस यू !

मिस यू !

ऋषी कपूर या जगातून जाऊन आज तीन वर्षे झाली असली तरीही ते आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयात वास्तव्य करून आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अकस्मात निधनाचा साऱ्यांना मोठा धक्का बसला होता. ३० एप्रिल २०२० रोजी बॉलिवूडच्या रोमान्स किंगने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त पत्नी नीतू कपूर आणि कन्या रिद्धीमा यांनी ऋषी कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या एका चित्रपटाच्या आऊटडोअर शूटिंगवेळी ऋषी यांच्या समवेत दिसत आहेत. त्या फोटोला कॅप्शन देताना म्हणतात की, तुझ्यासमवेत व्यतीत केलेल्या जगातील सर्वाधिक सुखी आणि आनंदी आठवणीसह प्रत्येक क्षणाला तुला गमावल्याची जाणीव होत राहते. या फोटोत नीतू यांनी निळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट वापरलेली आहे तर ऋषी यांनी निळ्या रंगाचा टी शर्ट वापरला आहे. मनीष मल्होत्रा, करिश्मा कपूर, राकेश रोशन, श्रद्धा रामा श्रीनाथ आदी अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करत ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यातील एक चाहता म्हणतो की, नेहमी आमच्या हृदयात राहाल. दुसरा चाहता म्हणतो की, तीन वर्षे झाली असली तरी तुम्ही या जगाचा निरोप घेतला यावर विश्वास बसणे कठीण होत आहे. बहुतेक चाहत्यांनी आम्ही तुम्हाला कसे मिस करतो याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ऋषी कपूर यांची कन्या रिद्धीमा हिनेही आपल्या इन्स्टाग्रामवर वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा फोटो शेअर केला असून त्यात रणबीर, ऋषी, नीतू, रिद्धीमा आणि रिद्धीमा यांची कन्या म्हणजे ऋषी कपूर यांची नात दिसत आहे. त्या फोटोखाली म्हणतात, प्रत्येक दिवस तुमच्या आठवणीत घालवत आहोत. कधी कधी गॅलरीतून खाली पाहात असताना तुम्ही हासत असलेला चेहरा नजरेसमोर तरळतो. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story