मिरर-मसाला : सान्याचा सन्मान

अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या तिच्या आगामी 'मिसेस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीला अलीकडेच ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये 'मिसेस' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 24 Jun 2024
  • 02:40 pm
Entertainment news, Sanya Malhotra

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या तिच्या आगामी 'मिसेस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीला अलीकडेच ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये 'मिसेस' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.  

सान्या म्हणाली, ‘‘माझी दिग्दर्शिका आरती आणि निर्माता हरमन बावेजा यांच्याकडून मेसेज आल्याचे मी पाहिले. मला पुरस्कार मिळेल असे वाटलेही नव्हते. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मी तिथे जाऊ शकले नाही. माझ्या मनात चालले होते लोकांना हा चित्रपट आवडला असेल का? जेव्हा मला या पुरस्काराबद्दल सांगण्यात आले, तेव्हा तो माझ्यासाठी खूप आश्चर्याचा क्षण होता. मी प्रथम माझ्या कुटुंबासह हे शेअर केले. एखादा पुरस्कार मिळाल्यावर अर्थातच आत्मविश्वास' वाढतो. या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे. चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे आणि लोकांना तो येथेही पाहता येईल. मला आशा आहे की चित्रपट सर्वांना आवडेल.’’

हा चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा सान्याच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. चित्रपटाची कथा एका नृत्यांगना ऋचाच्या जीवनावर आधारित आहे, जिचे लग्न अशा कुटुंबात होते जे मोकळेपणाचे नसते. घरातील कामे करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो. ज्याला ती विरोध करते.

सान्या म्हणाली, ‘‘हा एक अतिशय आव्हानात्मक व्यक्तिरेखा आणि खूप मजबूत संदेश असलेला चित्रपट आहे.’’ या चित्रपटाव्यतिरिक्त सान्या ही वरुण धवनसोबत दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या 'सनी संस्कृत की तुलसी कुमारी' या चित्रपटात काम करत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story