Nawazuddin siddiqui : 'माझ्या अभिनयामुळेच मला शाहरुख, आमिर, सलमान ओळखतात'

‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. शाहरुखसोबत ‘रईस’, सलमान खानसोबत ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ चित्रपटात नवाजुद्दिनने आमिर खानसोबत काम केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 03:27 am
'माझ्या अभिनयामुळेच मला  शाहरुख, आमिर, सलमान ओळखतात'

'माझ्या अभिनयामुळेच मला शाहरुख, आमिर, सलमान ओळखतात'

‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. शाहरुखसोबत ‘रईस’, सलमान खानसोबत ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ चित्रपटात नवाजुद्दिनने आमिर खानसोबत काम केले आहे.

नवाजने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्याचा बड्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अफवाह’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल खुलासा केला आहे. ‘अफवाह’च्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल त्याने सांगितले, “चित्रपट बनवल्यावर निर्मात्यांनी तो धैर्याने रिलीज केला पाहिजे. बरेच लोक मला फोन करून विचारत आहेत की, हा चित्रपट कुठे रिलीज होतोय? त्यांना काय सांगू चित्रपट कुठे रिलीज होणार? इंडस्ट्रीतील लोकही मला तेच विचारत आहेत, त्यांना मी काहीही सांगू शकत नाही. आता या चित्रपटाचे चांगले 

कलेक्शन झाले नाही, तर लोक म्हणतील नवाज फ्लॉप अभिनेता आहे. त्यापेक्षा निर्माते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करू शकले असते.”

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? याबद्दल विचारले असता नवाज म्हणाला, “बड्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव फारच मनोरंजक आहे. शाहरुख-सलमान असो किंवा आमिर… हे कलाकार जेव्हा त्यांच्याकडे चांगली वा तगडी स्क्रिप्ट असते तेव्हा मला फोन करतात. कारण, ते लोक मला आणि माझ्या कामाला ओळखतात. हे तिन्ही स्टार्स मला वैयक्तिकरीत्या ओळखतात, त्यामुळे माझे त्यांच्याशी असलेले नाते अतिशय घट्ट आहे. एवढे मोठे सुपरस्टार्स माझ्याशी इतक्या विनम्रपणे बोलत असतील, तर त्यांनी नक्कीच मला आपले मानले आहे.”

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story