मराठमोळी श्रद्धा!

बॉलिवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तू झुठी, में मक्कार या चित्रपटाच्या यशामुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रद्धाला ओळखले जाते. अभिनयाबरोबर श्रद्धाचा निरागसपणा, नम्रपणा नेटकऱ्यांना आपलासा करून घेतो. अलीकडेच एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर श्रद्धाने पापाराझ्झींशी चक्क मराठीमध्ये संवाद साधत त्यांना काही मजेशीर प्रश्न विचारले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 12 Jun 2023
  • 03:42 pm
मराठमोळी श्रद्धा!

मराठमोळी श्रद्धा!

बॉलिवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तू झुठी, में मक्कार या चित्रपटाच्या यशामुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रद्धाला ओळखले जाते. अभिनयाबरोबर श्रद्धाचा निरागसपणा, नम्रपणा नेटकऱ्यांना आपलासा करून घेतो. अलीकडेच एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर श्रद्धाने पापाराझ्झींशी चक्क मराठीमध्ये संवाद साधत त्यांना काही मजेशीर प्रश्न विचारले. सध्या श्रद्धाचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून श्रद्धा कपूरचा मराठीतून संवाद साधतानाचा व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओत श्रद्धा तिच्या मैत्रिणींबरोबर एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी श्रद्धाला पाहून पापाराझ्झींनी चांगलीच गर्दी केली होती. या वेळी श्रद्धा त्यांना म्हणाली की, तुम्हाला कसे कळले मी येथे आहे ? तेव्हा तिला एक पापाराझ्झी फोटोग्राफर म्हणाला की, तुमची गाडी पाहून आम्हाला कळले. तुम्हाला आतमध्ये जातानाही आम्ही पाहिले होते. श्रद्धा कपूर पुढे म्हणते की, तुम्हाला सगळ्यांच्या गाड्यांचे नंबर माहिती आहेत, माझ्या तर सगळ्या गाड्यांचे नंबर तुम्ही लक्षात ठेवलेले दिसतात. यावर सगळ्या पापाराझ्झींनी होकारार्थी उत्तर देत ते म्हणाले आम्हाला तुमच्या सगळ्या गाड्यांचे नंबर पाठ आहेत. सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि पापाराझ्झींमधील या मराठी संवादाचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

श्रद्धाचा हा व्हीडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. इतर सेलिब्रिटींप्रमाणे गोंधळ न घालता श्रद्धाने पापाराझ्झींबरोबर अतिशय नम्रपणाने संवाद साधला, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या व्हीडीओवर व्यक्त होत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story