बिग बॉसच्या घरात गाढवाची एन्ट्री

बिग बॉस मराठी ५’ शो रविवारी संपत आहे, तर दुसरीकडे ‘बिग बॉस १८’ चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. रविवारी म्हणजे ६ ऑक्टोबरपासून अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस १८' शोची सुरुवात झाली आहे.

File Photo

‘बिग बॉस मराठी ५’ शो रविवारी संपत आहे, तर दुसरीकडे ‘बिग बॉस १८’ चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. रविवारी म्हणजे ६ ऑक्टोबरपासून अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस १८' शोची सुरुवात झाली आहे. त्यातील स्पर्धकांची नावे आता हळू-हळू समोर येत आहेत. पण शोमध्ये एन्ट्री केलेल्या गाढवाने सर्वांचे मन जिंकले आहे.

कलर्स वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. व्हीडीओमध्ये दिसत असलेल्या गाढवाला पाहून चाहतेही चकित झाले आहेत. बिग बॉसच्या स्टेजवर गाढवाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. ‘बिग बॉस १८’ मध्ये प्राण्यांची काय भूमिका असेल? असा प्रश्नही चाहते उपस्थित करत आहेत. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसणाऱ्या गाढवाची चर्चा रंगली आहे.

प्रोमोमध्ये दिसणाऱ्या गाढवाचे नाव मॅक्स असे आहे. प्रोमोमध्ये दिसणार गाढव दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा आहे. बिग बॉसच्या घरात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत त्यांचे गाढवही राहणार आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा गाढव शोमध्ये राहणार आहे की नाही, याबद्दल निर्मात्यांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

पण चित्र लवकरच स्पष्ट होईल.  दरम्यान, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचाही एक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरला गाढव चारा खाताना दाखवण्यात आले होते. 'हम आते हैं डाकू की खानदान से' म्हणत गुणरत्न सदावर्ते एन्ट्री करताना दिसत आहेत. तर सदावर्तेंनी एन्ट्री केल्यानंतर सलमान खान जोरजोरात हसू लागतो.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story