रस्त्यावरचा कचरा उचलताना दिसली मलायका

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका हिचे व्हीडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील अभिनेत्रीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये अभिनेत्री रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. अभिनेत्रीचा व्हीडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. चाहते अभिनेत्रीचे कौतुक करताना दिसत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 29 May 2024
  • 05:18 pm
Malaika Arora latest

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका हिचे व्हीडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील अभिनेत्रीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये अभिनेत्री रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. अभिनेत्रीचा व्हीडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. चाहते अभिनेत्रीचे कौतुक करताना दिसत आहेत.

मलायका नेहमीनुसार, जीमसाठी जात होती. तेवढ्यात अभिनेत्रीला रस्त्यात कचरा दिसला. तेव्हा अभिनेत्रीने सर्व कचरा हाताने गोळा करत आत असलेल्या कचरापेटीत टाकला. मलायका हिची ही कृती पाहून चाहते देखील अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या व्हीडीओची चर्चा रंगली आहे. एक नेटकरी मलायकाचे कौतुक करत म्हणाला, ‘अशा गोष्टी प्रमोट करायला हव्यात. अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मलायकाने मन जिंकले. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कॅमेऱ्यासमोर कोणीही चांगले राहण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मलायका फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून मलायक अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चादेखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट २०१७ मध्ये झाला. त्यानंतर २०१९ मध्ये मलायका हिने अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. अनेकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोबत स्पॉट देखील करण्यात आले आहेत. लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगलेली असते. ‘योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती भेटल्यानंतर नक्की लग्न करेल, असे वक्तव्य देखील अभिनेत्रीने केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story