माही आणि गौरी यांची प्रेमकथा

‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेमकथा आहे. सुबोध भावे आणि शिवाणी सोनार हे कलाकार प्रमुख भूमिकेत या मालिकेत आहेत. शिवानी सोनार ही वेगवेगळ्या मालिकांमधून यापूर्वीच घराघरांत पोहोचली आहे. आता सुबोधसोबत नवीन अंदाजात ती दिसणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 5 Jul 2024
  • 11:57 am
Entertainment, 'Tu Bhetshi Navyane' , Subodh Bhave,  Shivani Sonar, new series

संग्रहित छायाचित्र

‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेमकथा आहे. सुबोध भावे आणि शिवाणी सोनार हे कलाकार प्रमुख भूमिकेत या मालिकेत आहेत. शिवानी सोनार ही वेगवेगळ्या मालिकांमधून यापूर्वीच घराघरांत पोहोचली आहे. आता सुबोधसोबत नवीन अंदाजात ती दिसणार आहे. छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वासात ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेची चर्चा आहे. कारण मराठीत नव्हे तर संपूर्ण देशात एखाद्या मालिकेत प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) वापर करण्यात आला आहे. सोनी मराठीवर वाहिनीवर ८ जुलैपासून ही मालिका येत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे याने डबल रोल केला आहे.

एक पन्नाशीच्या जवळ पोहचलेला सुबोध भावे तर दुसरा २५ वर्षांपूर्वीचा कॉलेजमधील सुबोध भावे आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेमध्ये सुबोधने डबल रोल केल्यामुळे त्याला डबल मानधन मिळाले असणार? असा प्रश्न सुबोध भावे याला विचारण्यात आला. यावेळी त्याने मजेशीर उत्तर दिले. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या पत्रकार परिषदेत सुबोध भावे याने हे उत्तर दिले. या पत्रकार परिषदेला सुबोध भावे, शिवानी सोनार यांच्यासह सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवनकर उपस्थित होते.  सुबोध भावे मानधनाच्या मुद्यावर बोलताना म्हणाले, तुम्ही मालिकेचा प्रोमो पाहिला. त्या प्रोमोमध्ये वर्ष १९९९ वर्ष दिले आहे. त्यामुळे त्या रोलचे मानधन १९९९ प्रमाणे मिळते. १९९९ मध्ये कलाकारांना ५० रुपये मानधन मिळत होते. ते मानधन मला मिळते. मी ते माझ्या दोन्ही मुलांमध्ये वाटतो. त्यांना खाऊसाठी ते पैसे होतात. परंतु २०२४ मध्ये मिळालेले मानधन माझ्यासाठी असते. सुबोध भावे याच्या या उत्तरानंतर सभागृहात चांगलाच हशा फिकला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story