Mahesh Babu : महेश बाबू पुन्हा सुटीवर

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबियांना एकत्र वेळ घालवण्यासाठी सुटीवर जाणे खूप आवडते. पुन्हा एकदा सुटी एन्जॉय करण्यासाठी ही कंपनी निघाली असता त्यांना हैदराबाद विमानतळावर पापाराझ्झींनी क्लिक केले आहे. महेशबाबू समवेत त्याची पत्नी, मराठमोळी नम्रता शिरोडकर आणि गौतम, सितारा ही मुले दिसत होती. स्टारपदाची कोणतीही लक्षणे दाखवण्याऐवजी महेशबाबूने पापाराझ्झींकडे पाहून स्मितहास्य केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 02:46 pm
महेश बाबू पुन्हा सुटीवर

महेश बाबू पुन्हा सुटीवर

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबियांना एकत्र वेळ घालवण्यासाठी सुटीवर जाणे खूप आवडते. पुन्हा एकदा सुटी एन्जॉय करण्यासाठी ही कंपनी निघाली असता त्यांना हैदराबाद विमानतळावर पापाराझ्झींनी क्लिक केले आहे. महेशबाबू समवेत त्याची पत्नी, मराठमोळी नम्रता शिरोडकर आणि गौतम, सितारा ही मुले दिसत होती. स्टारपदाची कोणतीही लक्षणे दाखवण्याऐवजी महेशबाबूने  पापाराझ्झींकडे पाहून स्मितहास्य केले.

निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि करड्या रंगाच्या जीनमध्ये महेश बाबू नेहमीप्रमाणे देखणा दिसत होता. त्याच्यासमवेत हॅट आणि बॅकपॅक होती. गेल्याच महिन्यात महेशबाबू आणि कंपनीने स्वित्झर्लण्डला भेट दिली होती. तेथील कुटुंबासमवेतचे फोटोही त्याने सोशल मीडियावर टाकले होते. महेशबाबूचा एसएसएमबी २८ हा त्रिविक्रम श्रीनिवासबरोबरचा आगामी चित्रपट काही कारणास्तव रद्द झाल्याचे समजले होते. या चित्रपटाचा निर्माता नागा वामसी याने मात्र गुरुवारी या सर्व अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नका, चित्रपटाचे शूटिंग शेड्यूलप्रमाणे सुरू असल्याचे स्पष्ट केले. ३१ मे रोजी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही त्याने जाहीर केले.

दरम्यान, ज्या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती तो एजंट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा नायक अखिल अक्कीनेनी हा प्रेक्षकांचा प्रतिसाद समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष चित्रपटगृहात उपस्थित असल्याचे आढळून आले. पांढरा टी शर्ट आणि जीनमध्ये असलेल्या अखिलला पाहून प्रेक्षकांना मोठा आनंद झाला. एजंटमधील भूमिकेसाठी अखिलने आपणात खूप बदल घडवून आणल्याचे दिसत होते. अखिलचे वडील नागार्जुन यांनी ट्विटरवर एक लक्षवेधी पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात की, माझा तरुण सहकारी आणि पुत्र अखिल याचा आयुष्यातील हा एक महत्त्वाचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. एजंटसाठी तु काय कष्ट घेतले आहेस त्याची मला कल्पना आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या आधारे तु प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करशील याची मला खात्री आहे. एका अभिमानी पित्याकडून आणि सहकाऱ्याकडून तुला खूप शुभेच्छा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story