Kriti Sanon : क्रिती म्हणते, टाईम हो गया अभी!

दिनेश विजन तयार करत असलेल्या एका वेगळ्या प्रेमकथेसाठी शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन यांना घेण्यात येणार असल्याचे वृत्त आता जुने झाले आहे. या चित्रपटाचे नाव अजून नक्की झालेले नसले तरी या चित्रपटाच्या रूपाने शाहिद क्रिती जोडी प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार असून या जोडीचा जलवा पाहण्यास प्रेक्षक कमालीचे आतूर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी क्रितीने चित्रपटातील एक पोस्टर शेअर केले होते. त्यात शाहिद आणि क्रिती एकत्र आल्याचे पाहावयास मिळत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 22 Apr 2023
  • 12:15 pm
क्रिती म्हणते, टाईम हो गया अभी!

क्रिती म्हणते, टाईम हो गया अभी!

दिनेश विजन तयार करत असलेल्या एका वेगळ्या प्रेमकथेसाठी शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन यांना घेण्यात येणार असल्याचे वृत्त आता जुने झाले आहे. या चित्रपटाचे नाव अजून नक्की झालेले नसले तरी या चित्रपटाच्या रूपाने शाहिद क्रिती जोडी प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार असून या जोडीचा जलवा पाहण्यास प्रेक्षक कमालीचे आतूर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी क्रितीने चित्रपटातील एक पोस्टर शेअर केले होते. त्यात शाहिद आणि क्रिती एकत्र आल्याचे पाहावयास मिळत होते. मात्र, यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आणि ते चित्रपटाची माहिती शोधायला लागले होते. चित्रपटाच्या पहिल्या चित्रीकरण सत्रानंतर मुंबईत ही जोडी एकत्र पाहावयास मिळाली. यावेळी शाहिदने सेल्फीसाठी पोझ दिली. क्रितीने मात्र पापाराझ्झींना आता खूप वेळ झाला आहे. आता तुम्ही छानपैकी विश्रांती घ्या असा सल्ला दिला. 

व्हायरल व्हीडीओमध्ये चित्रीकरण झाल्यानंतर शाहिद आपल्या कारकडे जाताना पाहावयास मिळत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला असून निळ्या रंगाची डेनिम जीन घातलेली आहे. सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी शाहिदला घेराव घातल्याचे दिसत आहे. शाहिदने आपल्या चाहत्यांची विनंती मान्य करत त्यांना सेल्फीसाठी पोझ दिली. त्यानंतर शाहिद आपल्या कारमधून निघून गेला.

दरम्यान, बाहेर आल्यावर मध्यरात्रीच्या सुमारासही पापाराझ्झींना पाहून क्रिती आश्चर्यात पडल्याचे दिसते. ती फोटोग्राफरना असे म्हणते की, टाईम हो गया अभी. जा के सो जाओ. क्रिती चारकोल ग्रे टॉपमध्ये असून तिने आपले केस बांधलेले आहेत. पापाराझ्झींना हात करून ती गाडीत बसून निघून गेली. 

दरम्यान, ८ एप्रिलला क्रितीने या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. या वेळी ती म्हणाली होती, जगावेगळ्या एका प्रेमकथेचे चित्रीकरण वेगात सुरू असून हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे. जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजन प्रस्तुत करत असलेल्या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे, लक्ष्मण उत्तेकर आणि मॅड्डॉक फिल्म करत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story