Kiara advani : कियाराचे सेलेब्रेशन !

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर समवेत कियारा अडवाणीने केलेल्या गोविंदा मेरा नाम नंतर कियाराचे आणखी काही महत्त्वाचे चित्रपट येत आहेत. राम चरणसमवेतच्या गेम चेंजरसह, सत्यप्रेम की कथा हा चित्रपट कियारा करत आहे. त्यामध्ये तिच्यासमवेत भूल भुलैय्या २ मधील कार्तिक आर्यन नायकाच्या भूमिकेत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 01:44 pm
कियाराचे सेलेब्रेशन !

कियाराचे सेलेब्रेशन !

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर समवेत कियारा अडवाणीने केलेल्या गोविंदा मेरा नाम नंतर कियाराचे आणखी काही महत्त्वाचे चित्रपट येत आहेत. राम चरणसमवेतच्या गेम चेंजरसह, सत्यप्रेम की कथा हा चित्रपट कियारा करत आहे. त्यामध्ये तिच्यासमवेत भूल भुलैय्या २ मधील कार्तिक आर्यन नायकाच्या भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांतील शूटिंगनंतर कियाराने अन्य कलाकारांसमवेत सत्यप्रेम की कथाचे चित्रीकरण संपवले आहे. शूटिंग संपल्यानंतर चित्रपटाच्या सेटवर एक छोटासा सेलेब्रेशनचा कार्यक्रम झाला. कियाराने या  सेलेब्रेशनमधील काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.      

फोटो शेअर करताना कियारा म्हणते की, ...आणि येथे सत्यप्रेम की कथा संपते. मला चित्रपटाची कथा खूप आवडली असून त्यासाठी काम करण्याचा अनुभव मी विसरू शकत नाही. सत्यप्रेम की कथा या चित्रपटासाठी आपले सारे सर्वस्व, कौशल्य पणाला लावून काम करणाऱ्या कलाकारांबरोबर, तंत्रज्ञांबरोबर काम करण्याचा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील. या प्रवासात मला काही नवे मित्र मिळाले आणि त्यांचे प्रेम मला कायमचे लाभत राहील.

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस, लेखक करण शर्मा, निर्माते शरीन मंत्री केडिया, कार्तिक आर्यन, गजराज राव, सुप्रिया पाठक आदींचेही कियाराने आभार मानले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत कियारा चित्रपटातील नायिकेच्या वेषभूषेत दिसत आहे. दुसऱ्या चित्रपटात कियारा आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसत आहेत. शेवटचे दोन फोटो चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर सेटवर झालेल्या सेलेब्रेशन कार्यक्रमाचे आहेत. यात कियारा चॉकललेट केक कापताना दिसत आहे. तिच्यासमवेत चित्रपटातील सर्व कलाकार असून ते टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. कियारा हलक्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहे. तिच्यासमवेत असलेला कार्तिक ग्रे पँट आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेल्या  सत्यप्रेम की कथा या चित्रपटात कियारा आणि कार्तिक नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. हा चित्रपट जून अखेरीस पडद्यावर येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story