‘केनडी’ने रडवले!

नुकत्याच झालेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सव २०२३’ निमित्ताने बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात अनुरागचा आगामी चित्रपट ‘केनडी’ दाखवण्यात आल्याने त्याच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा एक खास शो मुंबईत आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बड्याबड्या हस्तींची या वेळी हजेरी होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 5 Jun 2023
  • 11:46 am
‘केनडी’ने रडवले!

‘केनडी’ने रडवले!

नुकत्याच झालेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सव २०२३’ निमित्ताने बॉलिवूडचा दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट महोत्सवात अनुरागचा आगामी चित्रपट ‘केनडी’ दाखवण्यात आल्याने  त्याच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा एक खास शो मुंबईत आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बड्याबड्या हस्तींची या वेळी हजेरी होती. 

मनोज बाजपेयी, विजय वर्मा, शबाना आझमी, शेखर कपूर, सुधीर मिश्रा, वरुण ग्रोव्हर, नीरज घायवान, पियूष मिश्रा अशा मोठमोठ्या लोकांनी या वेळी हजेरी लावली. प्रत्येकालाच हा चित्रपट प्रचंड आवडला. प्रत्येकाने या चित्रपटाचे आणि अनुराग कश्यपचे तोंड भरून कौतुकही केले.

याबद्दल सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर म्हणतात की, अनुराग कश्यपचा चित्रपट पाहून उत्साहित झालो नाही असे आजवर कधीच घडलेले नाही. परंतु त्याच्या या चित्रपटाने मला रडवले आहे. मी या चित्रपटाचा भरपूर आनंद घेतला. चित्रपटाची कथा इतकी डार्क असूनही ती तितकीच गुंतवून ठेवणारी आहे, हे फार कमी दिग्दर्शकांना जमते

शेखर कपूर यांच्याबरोबरच सुधीर मिश्रा यांनीही चित्रपटाची प्रशंसा केली. त्यांनी तब्बल ४ वेळा हा चित्रपट पाहिल्याचं स्पष्ट केलं. या चित्रपटात सनी लिओनी आणि राहुल भट्टसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सनी चार्लीच्या भूमिकेत दिसणार आहे तर राहुल एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story