वयाच्या पन्नाशीत प्रभुदेवाला कन्यारत्न

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा यांना पुन्हा एकदा वडील होण्याचे सद्भाग्य लाभले आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. प्रभू यांनी पत्नी डॉ. हिमानीसोबत त्यांच्या कन्यारत्नाचे स्वागत केले आहे. प्रभू यांनी एका माध्यमसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, 'हो, हे खरे आहे. मी या वयात (वय वर्षे ५०) पुन्हा बाप झालो आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 14 Jun 2023
  • 02:05 pm
वयाच्या पन्नाशीत प्रभुदेवाला कन्यारत्न

वयाच्या पन्नाशीत प्रभुदेवाला कन्यारत्न

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा यांना पुन्हा एकदा वडील होण्याचे सद्भाग्य लाभले आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. प्रभू यांनी पत्नी डॉ. हिमानीसोबत त्यांच्या कन्यारत्नाचे स्वागत केले आहे. प्रभू यांनी एका माध्यमसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, 'हो, हे खरे आहे. मी या वयात (वय वर्षे ५०) पुन्हा बाप झालो आहे. मी खूप आनंदी आहे आणि आता मला पूर्णत्वाला गेल्याचा भास होतो आहे.'

प्रभू आता चौथ्यांदा पिता होण्याचे सुख अनुभवत आहेत. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, आपली मुले आणि कुटुंबासह अधिक वेळ घालवण्यासाठी कामाचा ताण कमी केला आहे. प्रभुदेवा यांनी अनेक हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 'राधे' चित्रपट हा त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला शेवटचा चित्रपट होता.

पहिली पत्नी रामलतापासून घटस्फोट घेतल्यानंतर ९ वर्षांनी प्रभू यांनी २०२० मध्ये डॉ. हिमानीशी दुसरे लग्न केले. प्रभू यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून ३ अपत्ये होती. त्यापैकी 

एकाचा कर्करोगाने मृत्यू झाला. उर्वरित दोन मुले आईसोबत राहतात. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story