ज्योतिकाचा फिटनेस!

ज्योतिका ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका असून वयाच्या ४४ व्या वर्षीही ती कमालीची ॲक्टीव्ह आहे. ज्योतिका सोशल मीडियावरही सक्रिय असून आपल्या फिटनेसबाबत ती सतत पोस्ट शेअर करत असते. फिटनेसबाबत कमालीची दक्ष असणाऱ्या ज्योतिकाने अलीकडेच एक व्हीडीओ शेअर केला आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:37 pm
ज्योतिकाचा फिटनेस!

ज्योतिकाचा फिटनेस!

ज्योतिका ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका असून वयाच्या ४४ व्या वर्षीही ती कमालीची ॲक्टीव्ह आहे. ज्योतिका सोशल मीडियावरही सक्रिय असून आपल्या फिटनेसबाबत ती सतत पोस्ट शेअर करत असते. फिटनेसबाबत कमालीची दक्ष असणाऱ्या ज्योतिकाने अलीकडेच एक व्हीडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हीडीओत ती वर्क आऊट करताना दिसत आहे. या व्हीडीओत ती हातावर चालताना दिसत आहे. उलटे चालताना तिने हातात एक फुटबॉल पकडला असून आपला तोल सांभाळत ती डोके खाली पाय वर अशा अवस्थेत चालत आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणते की, मॉम टर्न अपसाईड डाऊन स्पेल वॉव. ज्योतिकाने साऊथचा सुपरस्टार सूर्याशी विवाह केला असून साऊथ इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय जोडपे म्हणून त्यांना ओळखले जाते. या जोडप्याला दोन मुले असून यातील मुलीचे नाव दिव्या असे आहे तर मुलाचे नाव देव असे आहे.

रातचासीमधील भूमिकेबद्दल नाव झालेली ज्योतिका नेहमी आपल्यासमोरील उद्दिष्टांच्या सीमा विस्तारत असते. फिटनेस असो की अभिनय आपल्याला ठरलेल्या मर्यादा ओलांडायच्या आहेत हे तिने मनाशी निश्चित केलेले असते. ज्योतिकाचा हा व्हीडीओ पाहून कोणालाही वर्क आऊट करण्याची इच्छा होईल. 

गेल्या वर्षी तिने ४४ व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा तिने शेअर केलेल्या व्हीडीओत ती वेगवेगळ्या प्रकारचे वर्क आऊट करताना दिसत होती. ती अशाप्रकारे, निर्धाराने, जिद्दीने वर्क आऊट करते की कोणालाही त्यापासून प्रेरणा घेण्याची इच्छा होईल. मल्याळी सुपरस्टार मामुटीबरोबरच्या काथल-द कोअर या आगामी चित्रपटात ज्योतिका प्रेक्षकांना भेटणार आहे. द ग्रेट इंडियन किचन फेम दिग्दर्शक जे बेबी याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा एक फॅमिली ड्रामा असून तो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पडद्यावर येणार आहे. राजकुमार राव बरोबरच्या आगामी चित्रपटातून ज्योतिका बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. ज्योतिकाने दिग्दर्शक तुषारबरोबरचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story