Jitendra Joshi : पाककलेच्या कौशल्यामुळे जितूवर कौतुकाचा वर्षाव

मराठी सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार खवय्ये आहेत. पिठले, भाकरी, झुणका ते अगदी मासे, चिकन, मटन यांसारख्या विविध पदार्थांवर ते कायमच ताव मारताना दिसतात. नुकतेच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या अभिनयासह स्वयंपाकातील कौशल्यही दाखवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 5 May 2023
  • 04:00 pm
पाककलेच्या कौशल्यामुळे जितूवर कौतुकाचा वर्षाव

पाककलेच्या कौशल्यामुळे जितूवर कौतुकाचा वर्षाव

मराठी सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार खवय्ये आहेत. पिठले, भाकरी, झुणका ते अगदी मासे, चिकन, मटन यांसारख्या विविध पदार्थांवर ते कायमच ताव मारताना दिसतात. नुकतेच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या अभिनयासह स्वयंपाकातील कौशल्यही दाखवले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी म्हणजेच जितूला ओळखले जाते. त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने स्वतः आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे.

जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही पदार्थांचे फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे, यातील सर्वच पदार्थ त्याने स्वत: तयार केले आहेत.

“माझ्यासाठी जेवण तयार करणं, हे जवळजवळ विपश्यनेसारखेच आहे. ते बनवताना मी पदार्थ, चव, रंग, पोत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रेम या गोष्टींना व्यवस्थित हाताळतो. जेव्हा माझी आई, पत्नी, मुलगी, मोलकरीण आणि मित्र ते खाऊन तृप्त होताना दिसतात. जेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो, तेव्हा मला विशेष वाटते. त्यामुळे मी आशा करतो आणि देवाला प्रार्थना करतो की या पृथ्वीवरील प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे अन्न मिळावे. अन्न हे पूर्णब्रह्म! देव महान आहे!”, असे जितेंद्रने म्हटले आहे.

दरम्यान, जितेंद्रच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. “गोदावरीच्या चित्रीकरणावेळी हा टॅलेंट माहीत असता, तर तुला स्वयंपाकघरातच कोंडून ठेवले असते !” असे त्यांनी म्हटले आहे. तर, अभिनेता अनिकेत विश्वासरावने “तू कमाल आहेस”, अशा शब्दांत जितूचे कौतुक केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story