मिरर मसाला : जॅकलिनचा धक्कादायक खुलासा

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकमुळे चर्चेत आलेल्या जॅकलिन फर्नांडिसने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा ती इंडस्ट्रीत नवीन होती तेव्हा अनेकांनी तिला नाकाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अनेकांनी तिला तिच्या पासपोर्टमध्ये वय कमी करण्याचेही सांगितले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sat, 25 May 2024
  • 12:53 pm
jacqueline fernandez

संग्रहित छायाचित्र

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकमुळे चर्चेत आलेल्या जॅकलिन फर्नांडिसने (jacqueline fernandez) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा ती इंडस्ट्रीत नवीन होती तेव्हा अनेकांनी तिला नाकाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अनेकांनी तिला तिच्या पासपोर्टमध्ये वय कमी करण्याचेही सांगितले होते.

कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान ब्रूटशी झालेल्या संवादात जॅकलिन म्हणाली, ‘‘मला नाकाची सर्जरी करावी, असे अनेकांकडून आग्रहपूर्वक सांगण्यात आले होते. पण हा वेडेपणा आहे कारण मला माझे नाक खूप आवडते. असं काही करावं असं कधीच वाटलं नव्हतं.  त्यामुळे मी माझ्या मातावर ठाम राहिले.’’

जॅकलिन ही ‘मिस श्रीलंका’ राहिलेली आहे. जॅकलीनने या मुलाखतीत सांगितले की, ‘‘जेव्हा मी येथे आले तेव्हा मला भीती वाटली कारण एका अभिनेत्याने मला सांगितले होते की तू ३० वर्षांची आहेस. इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी हे वय जास्त आहे. तू वय लपवायला हवे. त्याचा सल्ला ऐकून मी खूप घाबरले होते. त्याचे बोलणे ऐकून खूप निराश झाले. मात्र सर्व वयोगटात महिलांना येथे काम मिळत आहे. मला वाटते की ही एक मोठी गोष्ट आहे.’’ नुकतीच जॅकलिन फर्नांडिस कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग बनली आहे. पहिल्या दिवशी तिने गोल्डन बॉडी कॉन ड्रेस घातला होता, तर दुसऱ्या दिवशी ती पांढऱ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये दिसली होती. कामाबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलिन लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, लारा दत्ता, सुनील शेट्टी, दिशा पटानी, राजपाल यादव, परेश रावल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story