Kriti Sanon : क्रितीची जानकी !

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत यांच्या पौराणिक कथेवर आधारित आदिपुरुषबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. त्यातच या चित्रपटात क्रिती सॅनन, प्रभास, सैफ अली खान सारखी तगडी स्टारकास्ट असल्याने अपेक्षा वाढणार यात काही शंका नाही. भारतात आणि परदेशातही लोकप्रिय असलेल्या रामायणाच्या कथानकावर आधरित हा चित्रपट आहे. गेले अनेक महिने त्याचे शूटिंग सुरू होते. रामनवमीच्या मुहूर्तावर आदिपुरुषचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:36 pm

क्रितीची जानकी !

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत यांच्या पौराणिक कथेवर आधारित आदिपुरुषबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. त्यातच या चित्रपटात क्रिती सॅनन, प्रभास, सैफ अली खान सारखी तगडी स्टारकास्ट असल्याने अपेक्षा वाढणार यात काही शंका नाही. भारतात आणि परदेशातही लोकप्रिय असलेल्या रामायणाच्या कथानकावर आधरित हा चित्रपट आहे. गेले अनेक महिने त्याचे शूटिंग सुरू होते. रामनवमीच्या मुहूर्तावर आदिपुरुषचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

आदिपुरुषमध्ये क्रिती सॅनन जानकीची भूमिका करत असून सीतेच्या भूमिकेतील दोन नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये फक्त क्रितीच असून एका फोटोमध्ये ती पांढऱ्या साडीत असून भगव्या रंगाची शाल तिने डोक्याभोवती गुंडाळलेली दिसते. मागच्या बाजूला प्रभास असून त्याच्या हातात धनुष्य आणि बाण आहे. दुसऱ्या फोटोत क्रितीचा क्लोजअप असून त्यात तिचे सौंदर्य उठून दिसते. लाल बिंदी आणि सिंदूरमुळे क्रिती वेगळी दिसते. या फोटोला कॅप्शन देताना क्रिती म्हणते की, अमर है नाम, जय सिया राम! अभिनेता प्रभासनेही हेच पोस्टर शेअर केले आहे. 

प्रतिक्रियांचा विचार केला तर क्रितीचे फॅन या पोस्टरने प्रभावित झालेले दिसतात. एक नेटिझन म्हणतो की, बेस्ट लूक ऑफ क्रिती सॅनन. दुसरा फॅन म्हणतो की, व्हॉट अ पोस्टर. #आदिपुरुष ब्लॉकबस्टर जय सिया राम.  

आदिपुरुषमध्ये अभिनेता प्रभास हा राघव ही मध्यवर्ती भूमिका करत आहे. आदिपुरुषमध्ये राघव हा अयोध्येचा राजा दाखवला आहे. लंकेचा राजा रावणाने अपहरण केलेल्या जानकीची सुटका करण्यासाठी राघव लंकेला जातो, त्याच्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात कोणते प्रसंग घडतात याची कथा म्हणजे आदिपुरुष असे म्हणता येईल. सात हजार वर्षांपूर्वी घडलेली ही कथा मांडताना दिग्दर्शकांच्या कल्पकतेची कसोटी लागणार आहे. बॉलिवूड स्टार सैफ अली खान हा यात रावणाची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सैफ प्रथमच तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. आदिपुरुष हा चित्रपट या वर्षीच्या जूनमध्ये पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट थ्री डी आणि आयमॅक्समध्ये तयार होत आहे. भूषण कुमार, किशन कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर चित्रपटाचे निर्माते आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story