Zia Khan : जिया खान प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सूरज पांचोलीने पोस्ट शेअर केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 02:35 pm
जिया खान प्रकरणात  सूरज पांचोली निर्दोष

जिया खान प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सूरज पांचोलीने पोस्ट शेअर केली आहे.

सूरज पांचोलीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. “सत्याचा नेहमीच विजय होतो,” असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर सूरज पांचोलीने केलेल्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

जिया खान आत्महत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेऊन अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून, अभिनेता आदित्य पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. “पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचे सिद्ध झाले आहे,” असे विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय देताना सांगितले.

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने २५ व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवले होते. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story