मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगवरुन सध्या वेगळ्याच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

 Ihaveneverdancedatanyone'swedding

मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगवरुन सध्या वेगळ्याच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला लावलेली उपस्थिती खूप काही सांगून जाणारी होती. यात आता कंगनाच्या पोस्टने प्री वेडिंग आणि त्याला उपस्थिती लावणारे सेलिब्रेटी वरुन वाद सुरु झाला आहे.

कंगना ही बॉलीवूडमधील अशी एक सेलिब्रेटी आहे ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते. आता पुन्हा कंगना ही तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती पोस्ट तिने अनंत अन् राधिका प्री वेडिंगला उपस्थिती लावणाऱ्या सेलिब्रेटींविषयी तर नाही ना....अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. कंगनाच्या इंस्टा स्टोरीचा स्क्रिन शॉट व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तिने स्वतःची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत केली आहे. तिने एका लेखाचा दाखला दिला आहे. ती म्हणते, मला पाच लाख डॉलर दिले तरी मी येणार नाही. मी खूप साऱ्या बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरी गेली आहे. मात्र आता मी आणि लताजी आम्ही दोघेच असे सेलिब्रेटी आहोत ज्यांची सगळी गाणी लोकप्रिय झाली आहे.

यावेळी कंगनाने 'फॅशन का जलवा', 'घनी बावली हो गई', 'लंडन ठुमकदा', 'साडी गली', 'विजय भव' या गाण्यांचे दाखले दिले आहेत. मात्र आम्ही असे काही केले नाही. लोक मला कितीही प्रलोभने दाखवू देत मी कधीही दुसऱ्यांच्या लग्नात नाचले नाही. कित्येकदा सुपरहिट आयटम साँग देखील मला ऑफर करण्यात आले होते. पण ते केले नाही.मी कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला गेली नाही. पैसा आणि प्रसिद्धी याला नाही म्हणण्यासाठी तुमच्याकडे शुद्ध चारित्र्य आणि अभिमानाची गरज असते. युवा पिढीला एक गोष्ट समजण्याची गरज आहे की, सर्वात मोठे धन हे ईमानदारी आहे. कंगनाने भलेही त्या पोस्टमध्ये कुणाचे नाव घेतले नाही. पण तिच्या त्या पोस्टवरुन ती कुणाबद्दल बोलली आहे याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story