संग्रहित छायाचित्र
‘हीरामंडी-द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, (Manisha Koirala) सोनाक्षी सिन्हा, (Sonakshi Sinha) अदिती राव हैदरी, (aditi rao hydari) रिचा चड्ढा, (Richa Chadha) संजिदा शेख, (Sanjeeda Sheikh) शर्मीन सेगल (Sharmeen Segal)अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘हीरामंडी’मधील या अभिनेत्रींचे सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे.
‘हीरामंडी’मधील प्रत्येकीची भूमिकादेखील तशीच तोडीस तोड आहे. यातली संजिदा शेख हिने साकारलेली वहिदा भूमिकादेखील तितकीच लक्ष वेधून घेणारी ठरली. वेगवेगळ्या प्रकारचे भाव या भूमिकेद्वारे संजिदाला मांडायचे होते. चेहऱ्यावरील जखमेपासून ते तिच्या मनावर झालेल्या जखमेपर्यंतचा वहिदाचा प्रवास दाखवला होता. या दरम्यान संजिदाने अनेक मुलाखतींना हजेरी लावली होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संजिदाने ती कॅमेरासमोर कशी निर्वस्त्र होते याबद्दल सांगितले. मी एक अभिनेत्री म्हणून खूप निर्लज्ज झाले होते. मी कॅमेरासमोर नग्न असते. मला कधीच संकोच नसतो. पण, आता मी जे काही करतेय त्याच्याशी मला प्रामाणिक राहायचे आहे. मला कॅमेरासमोर प्रामाणिक राहायचे आहे. मला भूमिकेसाठी प्रामाणिक राहायचे आहे. हेच माझ्या मनात असते.
मी स्वत: अशा माणसाबरोबर काम करते आहे, जो स्वत:शी प्रामाणिक आहे आणि त्याला त्याचे काम आवडते. त्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीचा नव्याने शोध घ्यायला आवडते आणि ती गोष्ट विकसित करायला आवडते. संजिदा असेही म्हणाली की, संजय सर जेव्हा सेटवर येतात तेव्हा असे वाटते की, लहान कोणीतरी मुलगा सेटवर आला आहे, ज्याला काहीतरी नवीन करायचे आहे. अशाप्रकारचा उत्साह नेहमी संजय सरांमध्ये असतो.