हिरानींचा शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव

पठाणच्या यशानंतर किंग खान म्हणजेच शाहरुख खान कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची प्रतीक्षा आहे. आपल्या कारकिर्दीत शाहरुख प्रथमच राजकुमार हिरानी यांच्या बरोबर काम करत असल्याचे वृत्त आहे. सामाजिक विषयावर आधारित डुंकीमध्ये शाहरुख आणि हिरानी एकत्र आलेले आपणास दिसतील.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 03:20 pm
हिरानींचा शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव

हिरानींचा शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव

पठाणच्या यशानंतर किंग खान म्हणजेच शाहरुख खान कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची प्रतीक्षा आहे. आपल्या कारकिर्दीत शाहरुख प्रथमच राजकुमार हिरानी यांच्या बरोबर काम करत असल्याचे वृत्त आहे. सामाजिक विषयावर आधारित डुंकीमध्ये शाहरुख आणि हिरानी एकत्र आलेले आपणास दिसतील. 

गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये फ्लोअरवर गेलेला हा चित्रपट निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच तो पडद्यावर येईल. टीझरवरून तरी हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल असे वाटते. हिरानी यांनी शाहरुखबरोबर काम करताना आलेले अनुभव एका मुलाखतीत शेअर केले असून त्यात त्यांनी शाहरुखचे तोंड भरून कौतुक केले आहे. आपल्या भूमिकेची तयारी करण्यासाठी कष्ट घेण्याची शाहरुखची तयारी आहे याची आपणाला अगोदर कल्पना नव्हती असे प्रांजळपणे कबूल करून हिरानी म्हणतात की, त्याच्याबरोबर काम करणे एक वेगळा आनंद असून त्याचे शब्दात वर्णन करणे अवघड आहे. त्याच्यात एवढी एनर्जी असते की त्याच्यामुळे सेटवरील प्रत्येकजण उत्साही आणि आनंदी बनतो. 

एक महत्त्वाचा ॲक्टर म्हणून मी त्याच्याकडे पाहात होतो. मात्र, आपल्या भूमिकेसाठी तो किती तयारी करतो याचा मला प्रथमच अनुभव आला. अभिनेत्याने अगोदर तयारी केली असेल तर काम करायला आणखी सोपे जाते. 

आपल्यावरील दृश्यांचे घरी चित्रीकरण करून तो आपल्याकडे क्लिप पाठवत असे. त्यात हे दृश्य पंधरा वेगवेगळ्या प्रकारे कसे सादर करता येईल याची पूर्ण कल्पना असे. त्यामुळे सेटवर जाण्यापूर्वी शाहरुख काय करू शकतो याची मला चांगली कल्पना येई. कधी कधी असे झाले आहे की मी एखाद्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवसांचा वेळ ठेवला असेल तर त्याचे चित्रीकरण त्याने दोन तासांत संपवल्याचेही घडले आहे. 

शाहरुख सकाळी सात वाजता चित्रीकरणासाठी सेटवर आल्याचेही मी पाहिले आहे. तसेच त्याचे भाषेवर कमालीचे प्रभुत्व आहे. जवानच्या शूटिंगनंतर शाहरुख डुंकीच्या चित्रीकरणात मग्न असेल. जवानची जबाबदारी तामिळी ॲटली याच्यावर असून चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत. सामाजिक विषयावर जवानची पटकथा बेतलेली असून तिच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story