संग्रहित छायाचित्र
अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. त्यापूर्वी तो मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीला (georgia andriani) डेट करत होता. आता जॉर्जियाचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अरबाजशी ब्रेकअप केल्यानंतर तिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. अत्यंत बोल्ड अंदाजात जॉर्जिया नुकतीच एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने सोनेरी रंगाचा शॉर्ट बॅकलेस ड्रेस घातला होता. या रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यानंतर जॉर्जियासोबत एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीसोबत तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. इतकेच नव्हे तर फोटोसाठी पोझ देताना त्या व्यक्तीने जॉर्जियाला किससुद्धा केले. ही व्यक्ती स्टारकिड असून त्याचे वडील बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. या स्टारकिडचं नाव सिकंदर खेर (Sikandar Kher)आहे आणि त्याचे वडील अनुपम खेर आहेत.
जॉर्जिया अँड्रियानी आणि सिकंदर खेरचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना सिकंदर आणि जॉर्जिया एकमेकांच्या खूप जवळ येतात. यानंतर जॉर्जिया तिचा ड्रेस ठीक करण्यासाठी त्याच्यापासून थोडी दूर जाते. नंतर सिकंदर तिला पुन्हा जवळ घेऊन डोक्यावर किस करतो. या व्हीडीओमुळे जॉर्जिया आणि सिकंदर यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर याने २००८ मध्ये ‘वुडस्टॉक व्हिला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘खेलें हम जी जान से’, ‘प्लेयर्स’, ‘औरंगजेब’, ‘तेरे बिन लादेन: डेड ऑर अलाइव्ह’ आणि ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. २०२० मध्ये तो ‘आर्या’ या ड्रामा सीरिजमध्ये झळकला. सिकंदर हा किरण खेर आणि त्यांचे पहिले पती गौतम बेरी यांचा मुलगा आहे. तो अनुपम खेर यांचा सावत्र मुलगा आहे.
अरबाजने २०१७ मध्ये मलायका अरोराला घटस्फोट दिला. त्यानंतर तो इटलीची मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जियाला डेट करू लागला होता. हे दोघे बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर जॉर्जियाने एक मुलाखत दिली होती. त्यात ती अरबाज आणि मलायकाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. अरबाजसोबत ब्रेकअप झाले असले तरी माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील, प्रेम असेल, असेही ती म्हणाली होती.