स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या ट्रेलरमध्ये अंकिता लोखंडेने साकारलेल्या यमुनाबाईच्या भूमिकेचे चाहत्यांनी केलं कौतुक

रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' च्या ट्रेलरमध्ये अंकिता लोखंडे यमुनाबाईच्या भूमिकेत चमकली

AnkitaLokhandinthetrailerofSwatantraVeerSavarkar

स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या ट्रेलरमध्ये अंकिता लोखंडेने साकारलेल्या यमुनाबाईच्या भूमिकेचे चाहत्यांनी केलं कौतुक

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि अंकिता लोखंडेचे च्या चाहत्यांनी तिच्या या खास भूमिकेचं कौतुक केलं आहे. अंकिता चा लूक नक्कीच वेगळा आणि म्हणून तिच्या अभिनयाची जादू यातून बघायला मिळणार आहे. अंकिता या चित्रपटात प्रसिद्ध क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

 सोशल मीडिया वर अंकिता च्या चाहत्यांनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलं असून तिच्या साठी खास पोस्ट लिहिल्या आहेत. अकाऊंटवर एका चाहत्याने लिहिले की, "अंकिता तिच्या देशभक्ती साठी अनोखी भूमिका साकारणार आहे. "

दुसऱ्याने नमूद केले की, "आमची अष्टपैलू अभिनेत्री अंकिता लोखंडे पात्राला न्याय देत आहे. तिच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे."दुसऱ्या एका चाहत्याने यमुनाबाईची अंकिताची भूमिका कशी "प्रभावी" आणि "हृदयस्पर्शी" आहे याचा उल्लेख केला.

या भूमिकेबद्दल बोलताना अंकिताने यमुनाबाईंना एक सशक्त महिला असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणते " जेव्हा माझ्या लूकची चर्चा होत होती तेव्हा रणदीपने स्पष्टपणे नमूद केले होते की, त्याला माझ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप नको आहे. यमुनाबाईंप्रमाणेच मी साधी सरळ असावी अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे मला हा रोल परफॉर्म करण्यात मज्जा आली "

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट रणदीप हुड्डा ने दिग्दर्शित केला असून  22 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story