विवाहबाह्य संबंध ठरले डोकेदुखी !

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने गेल्या वर्षीच दुसऱ्यांदा लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. या अभिनेत्रीनं गेल्या वर्षी आफ्रिकन व्यावसायिक निखिल पटेलसोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर ही अभिनेत्री आपल्या मुलासह दुसऱ्या पतीसोबत परदेशात स्थायिक झाली

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 27 May 2024
  • 11:27 am
DALLJIET KAUR

संग्रहित छायाचित्र

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (DALLJIET KAUR) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने गेल्या वर्षीच दुसऱ्यांदा लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. या अभिनेत्रीनं गेल्या वर्षी आफ्रिकन व्यावसायिक निखिल पटेलसोबत (Nikhil Patel) दुसरे लग्न केले. त्यानंतर ही अभिनेत्री आपल्या मुलासह दुसऱ्या पतीसोबत परदेशात स्थायिक झाली. पण आता तिचा दुसरा संसारही मोडला असल्याची चर्चा सुरू झाली होती. ती मुलासह भारतात परतली आहे. एवढेच नाही तर तिने पतीसोबतचे सगळे फोटो इंस्टाग्रामवरून हटवले आहेत. पण तिचा दुसरा संसार नक्की का मोडला याचे कारण समजू शकले नव्हते.

आता तिने एका पोस्टमधून यावर मौन सोडले आहे. दलजित कौरचे पहिले लग्न 'बिग बॉस' फेम अभिनेता शालिन भनोटसोबत (Shalin Bhanot) झाले होते. दोघांना एक मुलगादेखील आहे. मात्र लग्नानंतर  काही  वर्षातच दोघांचा संसार मोडला. त्यानंतर दलजित कौरने मार्च २०२३ मध्ये निखिल पटेलसोबत लग्नगाठ बांधली. निखिलचेही हे दुसरे लग्न होते त्याला आधीच दोन मुलीदेखील होत्या. लग्नानंतर दलजीत आपल्या मुलासह केनियाला शिफ्ट झाली होती. पण काहीच दिवसात ती भारतात परतली. या दलजितच्या दुसऱ्या लग्नात दोघांत नक्की काय बिनसले हे चाहत्यांना जाणून घ्यायचे होते.

आता अभिनेत्रीने याविषयी खुलासा केला आहे. अभिनेत्री टीव्ही शोपासून दूर आहे, पण ती अनेक जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंट करत राहते. तिने नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लाल लेहेंगा, नेकलेस, अनेक दागिने, मांग टिक्का अशा नव्या नवरीच्या वेशात दिसत आहे. यात तिच्या चेहऱ्यावर मात्र दुःख आहे. हा व्हीडीओ शेअर करत दलजीतने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुलासाठी तिने गप्प राहायचे ठरवले आहे. या काळात ती खचून जाऊ नये म्हणून तिचे कुटुंबीय तिला आधार देत आहेत, ती वाट पाहात आहे’ असे म्हणत तिने आपल्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. 

याशिवाय दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हीडीओ पोस्ट करत ‘विवाहबाह्य संबंधांबद्दल तुमचे मत काय? याला जबाबदार कोण? मुलगी, नवरा की बायको?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळेच दलजितच्या दुसऱ्या घटस्फोटामागे तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध हे कारण असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. 

ही पोस्ट पाहिल्यानंतर दलजीतचे चाहते चिंतेत पडले आहेत. चाहते या पोस्टवर कमेंट्स करत तिला धीर देत आहेत. ‘तू खूप स्ट्राँग आहेस’, ‘हिंमत ठेव, तू काहीही चुकीचे केलेले नाही हे तुला माहीत आहे, असे म्हणत चाहते तिला आधार देत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story