‘डॉन’ येणारच पण...

फरहान अख्तर हा कायम चर्चेत असतो. दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणने त्याने चांगले नाव कमावले आहे. तो दिग्दर्शित करणार असलेल्या ‘डॉन ३’ हा चित्रपट घोषणा झाली, तेव्हापासून चर्चेच आहे. पूर्वी, यात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र, त्याने यातून अंग काढून घेतल्यावर रणवीर सिंग (Ranveer Singh) याला मुख्य भूमिकेसाठी करारबद्ध करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 24 Jun 2024
  • 03:08 pm

संग्रहित छायाचित्र

फरहान अख्तर हा कायम चर्चेत असतो. दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणने त्याने चांगले नाव कमावले आहे. तो दिग्दर्शित करणार असलेल्या ‘डॉन ३’ हा चित्रपट घोषणा झाली, तेव्हापासून चर्चेच आहे. पूर्वी, यात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र, त्याने यातून अंग काढून घेतल्यावर रणवीर सिंग (Ranveer Singh) याला मुख्य भूमिकेसाठी करारबद्ध करण्यात आले. त्यापूर्वी आणि नंतरही हा चित्रपट होणार की नाही, याबाबत बाॅलिवूडविश्वात चर्चा होत होती. अखेर फरहान अख्तरने (Farhan Akhtar) हा चित्रपट विलंबाने का होईना, पण नक्की रिलीज होणार, याची ग्वाही दिली आहे.  

रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॉन ३’चे शूटिंग पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये सुरू होईल. कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट स्टारर 'जी ले जरा' हा चित्रपट रद्द करण्यात आल्याीही चर्चा जोकरात होती. मात्र, ही अफवा असल्याचे सांगत फरहानने हे वृत्त फेटाळून लावले. याविषयीही बोलताना तो म्हणाला, ‘‘ही चर्चा का आणि कशामुळे सुरू झाली, हे मला सांगता येणार नाही. मात्र, एक गोष्ट मी जाहीररित्या ठामपणे सांगू इच्छितो की, हा चित्रपट बनणार असून त्याचे दिग्दर्शनही मीच करणार आहे.’’

फरहान दिग्दर्शित ‘लक्ष्य’ या चित्रपटाला १८ जून रोजी २० वर्षे पूर्ण झाली. यावेळी फरहानने विशेष मुलाखत दिली.   यावेळी त्याने ‘डॉन ३’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटांबद्दल चर्चा केली. फरहान म्हणाला, ‘‘आम्ही पुढच्या वर्षी ‘डॉन ३’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहोत. मी स्वतः त्याची वाट पाहत आहे. या चित्रपटात अनेक बदल झाले. ते आपण जाणताच. या सर्व गोष्टी या क्षेत्रात होतच राहणार. पण हा चित्रपट रसिकांच्या भेटीला नक्की येणार आहे, याची सर्वांनी खात्री बाळगावी. ‘जी ले जरा’ या चित्रपटाचीही आम्ही घोषणा केली आहे. याचे दिग्दर्शनदेखील मी करत आहे.’’

चित्रपट दिग्दर्शित करून खूप दिवस झाले आहेत. मला या चित्रपटांचे दिग्दर्शन करावेसे वाटते. चित्रपटाच्या शूटिंगची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही, हे खरे आहे. पण येत्या काळात ती जाहीर करण्यात येईल. या प्रकल्पात अनेकांचा सहभाग आहे. प्रत्येकाचा विचार करून तारीख निश्चित केली जाते. त्यासाठी याला वेळ लागत आहे. मात्र, दिग्दर्शक म्हणून तुम्ही माझे हे दोन चित्रपट नक्की बघणार हे नक्की, अशी ग्वाहीदेखील फरहानने यावेळी दिली.

ऑगस्ट २०२३मध्ये फरहान अख्तरने खुलासा केला होता की ‘डॉन ३’ या चित्रपटात शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगला कास्ट करण्यात आले आहे. या बातमीने संपूर्ण खळबळ उडाली. त्याचवेळी अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव मेन लीडमध्ये होते.

१९७८ मध्ये आलेल्या ‘डाॅन’च्या पहिल्या आवृत्तीत अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. शाहरुख खान २००६ च्या ‘डॉन’मध्ये दिसला होता.  २०२१ मध्ये ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ही तीन मुलींच्या रोड ट्रिपची कथा असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. या चित्रपटाचे लेखन झोया अख्तरने केले आहे. रीमा कागती, झोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर याचे दिग्दर्शन करणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story