चर्चा दिव्यांकाची -‘परफेक्ट मॅरेज मटेरियल’

दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही मालिकेच्या क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिव्यांका ३९ वर्षांची असली तरी टीव्ही मालिका आवडणाऱ्या पुरुष वर्गामध्ये ती ‘परफेक्ट मॅरेज मटेरियल’ म्हणून प्रसिद्ध आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 16 Jul 2024
  • 11:58 am
Divyanka Tripathi, TV serials, hot actress, perfect marriage material, popular actress, bollywood, film industry

संग्रहित छायाचित्र

दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही मालिकेच्या क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिव्यांका ३९ वर्षांची असली तरी टीव्ही मालिका आवडणाऱ्या पुरुष वर्गामध्ये ती ‘परफेक्ट मॅरेज मटेरियल’ म्हणून प्रसिद्ध आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी दिव्यांका नेहमी पाय जमिनीवर ठेऊन वागत असल्यामुळे तिची फॅनफाॅलोईंग लक्षणीय आहे. तर अशी ही दिव्यांका पती विवेक दहियासह लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी पतीसह युरोप टूरवर गेली होती.

मात्र, तेथे त्यांच्या वस्तूंची चोरी झाली. यात पासपोर्टचाही समावेश होता. दिव्या आणि विवेक अडचणीत सापडले असताना युरोपातील भारतीय दूतावासाने त्यांची मदत केली आणि पासपोर्टची व्यवस्था केली. यामुळे दिव्यांका आणि विवेक यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story