धकधक गर्ल माधुरी होती गावस्करांच्या प्रेमात !

क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचे फार जवळचे नाते आहे. काही क्रिकेटर आणि सेलिब्रिटींमध्ये चांगली मैत्री आहे, तर काही क्रिकेटपटूंचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sun, 14 Jul 2024
  • 03:24 pm
Entertainment news, famous Bollywood actresses, madhuri dixit, Sunil Gavaskar

संग्रहित छायाचित्र

क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचे फार जवळचे नाते आहे. काही क्रिकेटर आणि सेलिब्रिटींमध्ये चांगली मैत्री आहे, तर काही क्रिकेटपटूंचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आले आहे. सांगायचे झाल्यास अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंसोबत लग्न केले, तर काही अभिनेत्रींचे क्रिकेटपटूंवर असलेले प्रेम अर्धे राहिले. असेच काही झालेले आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत. एक काळ असा होता जेव्हा माधुरी आणि माजी क्रिकेटर अजय जडेजा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. फक्त झगमगत्या विश्वातच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रेमाबद्दल प्रत्येकाला माहिती होते, पण माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्यावर अभिनेत्रीचे क्रश होते.

सुनील गावस्कर असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे. सुनील गावस्कर हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक ठरले. तेव्हा तरुणींमध्ये सुनील गावस्कर यांची चर्चा सर्वत्र रंगलेली असायची. सुनील गावस्कर हे माधुरी हिच्यापेक्षा १८ वर्षाने मोठे आहेत. पण असे असताना देखील सुनील गावस्कर, माधुरीचे क्रश होते. एका मुलाखतीत माधुरी हिने मनातील भावना देखील बोलून दाखवल्या होत्या. ‘मी सुनील गावस्कर यांची फार मोठी चाहती आहे. मला त्यांच्या मागे धावायचे आहे…’ तेव्हा माधुरी फक्त २५ वर्षांची होती आणि सुनील गावस्कर हे ४३ वर्षांचे होते. अजय जडेजा राजघराण्यातील होते. तर माधुरी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणून अजयच्या कुटुंबीयांना दोघांचे नाते मान्य नव्हते.  अशा परिस्थितीत माधुरी दीक्षितच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या नात्याला विरोध केला.अनेक सेलिब्रिटींसोबत माधुरी हिच्या नावाची चर्चा झाली. पण झगमगत्या विश्वातील कोणत्या सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. अखेर माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि अमेरिकेत गेली. अनेक वर्षांनंतर माधुरी पुन्हा मुंबईमध्ये आली. आता अभिनेत्री  कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story