Deepika Padukone : दीपिकाला व्हायचं होतं विन डिझेलच्या मुलाची आई...

बॉलिवूडमधील हाॅट आणि सेक्सी अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) समावेश होतो. आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका कायम या ना त्या कारणावरून कायम चर्चेत असते. एका मुलाखतीत तिने आपली एक अपुरी इच्छा बोलून दाखवली...

Deepika Padukone

दीपिकाला व्हायचं होतं विन डिझेलच्या मुलाची आई...

बॉलिवूडमधील हाॅट आणि सेक्सी अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) समावेश होतो. आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका कायम या ना त्या कारणावरून कायम चर्चेत असते. एका मुलाखतीत तिने आपली एक अपुरी इच्छा बोलून दाखवली... ती म्हणजे, दीपिकाला हाॅलिवूडमधील प्रसिद्ध आणि तगडा अभिनेता विन डिझेलच्या (Vin Diesel)  मुलाची आई व्हायचे होते. मात्र, तिची ही इच्छा अपुरीच राहिली. (Bollywood) 

दीपिकाचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये दीपिका म्हणते, ‘‘हाॅलिवूड अभिनेता विनच्या मुलाची आई होण्याची माझी इच्छा होती.’’ या व्हीडीओमध्ये विन आपल्याला आवडत असल्याचेही दीपिकाने कबूल केले. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता या दोघांमध्ये काही तरी शिजत होतं, अशी शंका निर्माण होते.
 
दीपिकाचा एक जुना व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ती हाॅलिवूड अभिनेता विन डिझेलसोबत एका चॅट शोमध्ये त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी सिनेमांसह वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं. दीपिकाने त्यावेळी विन तिला आवडत असल्याचं सांगितलं होतं.

'द एलेन डिजेनर्स शो' या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दीपिकाने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने विनबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. दीपिका म्हणाली होती की, ‘‘मी विन डिझेलची मोठी चाहती असून त्याच्या मुलाची आई होण्याचाही मी विचार केला होता.’’ दीपिकाच्या कबुलनाम्याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून बहुतांश नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यात दीपिकासह तिचा पती रणवीर सिंहच्या चाहत्यांचाही समावेश आहे.

दीपिकाने २०१७ मध्ये 'XXX: Return Xander Cage' या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात दीपिकासोबत विन मुख्य भूमिकेत होता. या सिनेमातील दीपिकाच्या बोल्डनेस आणि लुक्सचं खूप कौतुक झालं होतं. दीपिकाचा हा हॉलिवूड अॅक्शनपट होता. पण सहकलाकार विनसोबत संसार थाटण्याच्या वक्तव्यामुळे दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या या वक्तव्यावर रणवीरला काय वाटलं होतं, हे  मात्र कधीच पुढं आलं नाही. त्याच काळात दीपिकाचा विनच्या मुलांसोबतचा फोटो समोर आला होता. यात ती विनच्या मुलांसोबत चांगलीच रमल्याचे दिसत होते.

दीपिकाने विनबद्दल भाष्य केलं तेव्हा तिचा अभिनेता रणवीरसोबत साखरपुडा झाला होता. रणवीरसोबत साखरपुडा झाल्यानंतर दुसरा कोणाचा विचार कशी करू शकते, यावरुन नेटकऱ्यांनी दीपिकाला प्रचंड ट्रोल केलं होतं. दीपिकाच्या या वक्तव्याने रणवीरचे चाहते मात्र नाराज झाले होते. दीपिका आणि रणवीर ही बांॅलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. ‘रामलीला...’ सिनेमाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. दीपिका-रणवीरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 
 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story