दीपिकाने केले नवऱ्याला ट्रोल!

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंग हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पडद्यावर किंवा पडद्याबाहेर या दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा होत असते. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. तसेच सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 12 Jun 2023
  • 03:41 pm
दीपिकाने केले नवऱ्याला ट्रोल!

दीपिकाने केले नवऱ्याला ट्रोल!

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंग हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पडद्यावर किंवा पडद्याबाहेर या दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा होत असते. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. तसेच सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. नुकताच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणवीर सिंहला टॅग करत एक मीम शेअर करत त्याला ट्रोल केले आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या मीममध्ये एक व्यक्ती झाडे खरेदी करत आहे आणि दुसरी व्यक्ती आपल्याकडे खूप झाडे असल्याचे सांगत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा मीम आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत दीपिकाने रणवीर सिंहला टॅग केले आहे. आता यावर रणवीर काय प्रतिक्रिया देणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

रणवीर-दीपिका या जोडीच्या नात्याची सुरुवात गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटाच्या शूटिंगपासून सुरू झाली होती. नंतरच्या काळात त्यांच्या आवडीचे रूपांतर २०१८ मध्ये दोघांच्या लग्नामध्ये झाले. अलीकडे दीपिकाने टाइम मासिकाला मुलाखत देताना पती रणवीर सिंहचे खूप कौतुक केले होते.

दरम्यान, दीपिका तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फायटर’ या चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र आहे. यापूर्वी ‘पठाण’ चित्रपटात दीपिकाने शाहरुख आणि जॉन अब्राहमसोबत काम केले होते. ‘पठाण’ २०२३ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटातही कॅमिओ करताना दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story