Deepika Padukone : दीपिकाही प्रेमात!

विक्रांत मॅसी (Vikrant Massey) आणि मेधा शंकर (Medha Shankar) स्टारर '12th फेल' हा चित्रपट रिलीज होऊन खूप दिवस लोटले, तरी त्याची चर्च सुरूच आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी दररोज या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

Deepika Padukone

दीपिकाही प्रेमात!

विक्रांत मॅसी (Vikrant Massey) आणि मेधा शंकर (Medha Shankar) स्टारर '12th फेल' हा चित्रपट रिलीज होऊन खूप दिवस  लोटले, तरी त्याची चर्च सुरूच आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी दररोज या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आलिया भट्टने या चित्रपटाचे कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली होती. दीपिकानेही (Deepika Padukone) तिची पोस्ट शेअर करत '12th फेल'चे कौतुक केले.

आलियाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते, ‘‘हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर चित्रपट आहे. विक्रांत मॅसी, '12th फेल' मधला तुझा परफॉर्मन्स किती छान आहे!  तू चित्रपटात इतका हुशार होतास की मी चकित झाले. मेधा शंकर ही तर मनोजच्या प्रवासाची ह्रदय आणि आत्मा आहे. सर्व काही हृदयस्पर्शी होते. विधू विनोद चोप्रा सर, तुमचा हा चित्रपट हृदयाला भिडतो. हा एक अतिशय प्रेरणादायी आणि भावनिक चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रेम ओसंडून वाहत आहे. संपूर्ण कलाकार आणि क्रूचे खूप खूप अभिनंदन. ते सर्व कौतुकास पात्र आहेत.’’ आलियाची पोस्ट शेअर करताना दीपिकाने लिहिले, ‘‘मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे.’’ यासोबतच दीपिकाने ‘12th फेल’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. मी या चित्रपटाच्या आणि टीमच्या प्रेमात पडले असल्याचे दीपिका म्हणाली.

‘एक्स’ अकाऊंटवर (पूर्वीचे ट्विटर) चित्रपटाचे कौतुक करताना हृतिकने म्हणतो, ‘‘मी ‘12th फेल’ पाहिला. हा चित्रपट निर्मितीतील मास्टरक्लास आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा मी चित्रपटाच्या साउंड इफेक्ट्सने खूप प्रभावित झालो, ज्याने चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात जीव जोडला. अतिशय उत्तम परफाॅर्मन्स! मिस्टर चोप्रा, काय चित्रपट आहे! हा चित्रपट प्रेरणा देणारा आहे.’’

अनुराग कश्यपने तर ‘12th फेल’ हे गेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट मुख्य प्रवाहातील चित्रपट म्हणून वर्णन केले आहे. तो म्हणाला, ‘‘हा चित्रपट हरवलेल्या दिग्दर्शकांसाठी एक नवीन मानक तयार करतो. दिग्दर्शकानेही या हरवलेल्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून स्वत:चे वर्णन केले.  विधू विनोद चोप्राने वयाच्या ७१ व्या वर्षी किती अप्रतिम चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट एका जिद्दी माणसाची कथा आहे, ज्याला आयुष्यात खूप काही मिळवायचे आहे. चित्रपटाबद्दल मला आश्चर्य वाटले ते म्हणजे या चित्रपटाने मुख्य प्रवाहातील चित्रपटांचे सर्व नियम कसे मोडले. त्याने ‘12th फेल’चे सीन साध्या लाँग शॉट्समध्ये शूट केले आहेत,’’ अशी प्रशंसा अनुरागने केली.

काय आहे ‘12th फेल’ची कहाणी?

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘12th फेल’ मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला. ‘झिरो’मधून ‘हिरो’ बनण्याची कहाणी चित्रपटात खूप छान दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘12th फेल’ या बेस्टसेलर पुस्तकावर तो आधारित आहे. विधू विनोद चोप्रा यांनी यूपीएससी प्रवेश परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे संघर्ष येतात आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते हे अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. अभिनेता विक्रांत मॅसीनेही आयपीएस मनोज शर्माच्या भूमिकेत आपले मन आणि आत्मा ओतला आहे. संघर्ष आणि आव्हानांच्या या वास्तविक जीवनातून प्रेरित चित्रपटाने लोकांची मने जिंकली आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story