प्रेम, मैत्री, ब्रेकअपचा मिलाफ!

ब्राझीलमध्ये नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी रात्री 'द आर्चीज' चा टीझर प्रदर्शित झाला. झोया अख्तरचा हा चित्रपट प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक कथांवर आधारित आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, दिवंगत श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 19 Jun 2023
  • 11:52 am
प्रेम, मैत्री, ब्रेकअपचा मिलाफ!

प्रेम, मैत्री, ब्रेकअपचा मिलाफ!

ब्राझीलमध्ये नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी रात्री 'द आर्चीज' चा टीझर प्रदर्शित झाला. झोया अख्तरचा हा चित्रपट प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक कथांवर आधारित आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, दिवंगत श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रपटात  मिहिर आहुजा, डॉट, युवराज मेंडा आणि वेदांग रैना हे देखील असून चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. आर्चीजचा टीझर पॉप संस्कृतीची आठवण करून देणारा आहे. रिव्हर डेल स्टेशनवर थांबलेल्या टॉय ट्रेनने व्हीडीओची सुरुवात होते. चित्रपटात रिव्हर डेल हे भारतातील एक हिल स्टेशन असून तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी तसे वातावरण तयार केले आहे. पात्रांचा गेटअप असो, कपडे असो किंवा फर हेअरस्टाइल असो तुम्हाला त्या काळात गेल्याचा भास होईल. 'द आर्चीज' मधील सुहाना खानच्या पात्राचे नाव वेरोनिका, तर खुशीच्या पात्राचे नाव बेट्टी आहे. चित्रपटाची कथा प्रेम, मैत्री आणि ब्रेकअप यांचा मिलाफ आहे. हा व्हीडीओ टीझर इन्स्टाग्रामवर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले आहे की, 'तुम्ही त्याला कॉमिक्स, पुस्तकांमध्ये आणि रिव्हरडेलमध्ये पाहिले आहे. यावेळी तुम्ही त्याला भारतात पाहाल. ६० च्या दशकावर एक कटाक्ष टाकत आर्चीज एक नवे जग दाखवेल. टीझरवर चाहत्यांचा चागला प्रतिसाद मिळाला असून अनेकजण म्हणतात की, आर्चीजच्या चाहत्यांसाठी  ही एक चांगली गोष्ट.

अनेकांनी झोया अख्तरच्या दिग्दर्शनाची प्रशंसा केली आहे, तर काहीजण असे म्हणतात की, पात्रे भारतीय कमी आणि युरोपियन जास्त दिसत आहेत. मात्र, चित्रपटाच्या संगीताचे कौतुक होत आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की,  झोया अख्तरच्या चित्रपटांमध्ये संगीत कधीही निराश करत नाही. आणखी एक चाहता म्हणतो की, सुहानाने ९० च्या दशकाची फॅशन खूप छान केली आहे. मी आर्चीज कॉमिक्स वाचायचो आणि माझ्यासाठी हे एक सुंदर पुनरागमन आहे. अन्य एक चाहता म्हणतो की, मी नेहमी आर्चीज कॉमिक्सचा चाहता आहे. 'कॉलेजमधील अशा मित्र मंडळाचा भाग होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story