नताशाने हार्दिक पांड्याला संपत्तीतील ७० टक्के वाटा पोटगी म्हणून मागितल्याचा दावा; हार्दिकने संपत्ती आईच्या नावावर केली असल्याची चर्चा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच घटस्फोट घेणार आहेत. पोटगी म्हणून नताशानं हार्दिकच्या संपत्तीतील तब्बल ७० टक्के वाटा मागितल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, हार्दिकने आपली बहुतेक सर्व संपत्ती आईच्या नावे केली असून नताशाला यापैकी काहीही मिळणार नसल्याचे बोलले जात आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 27 May 2024
  • 10:32 am
Hardik Pandya Natasha Stankovic

संग्रहित छायाचित्र

अहमदाबाद; मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) घटस्फोट घेणार आहेत. पोटगी म्हणून नताशानं हार्दिकच्या संपत्तीतील तब्बल ७० टक्के वाटा मागितल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, हार्दिकने आपली बहुतेक सर्व संपत्ती आईच्या नावे केली असून नताशाला यापैकी काहीही मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा घटस्फोट घेणार आहेत. पोटगी म्हणून नताशानं हार्दिकच्या संपत्तीचा ७० टक्के वाटा मागितल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.   नताशा व हार्दिक यांच्यामध्ये काही कारणास्तव मतभेद झाल्याने दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. हार्दिक आजघडीला कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे; पण घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आता हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा नताशाच्या नावे करावा लागणार, असे बोलले जात होते. अशातच हार्दिकचा एक जुना व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील हार्दिकचे वक्तव्य ऐकता घटस्फोटानंतर नताशाला त्याच्या संपत्तीतील हिस्सा मिळणार नसल्याचीही चर्चा जोरात सुरू झाली आहे.  

हार्दिक आणि सर्बियन अभिनेत्री तसेच डान्सर असलेली नताशा यांचा विवाह ३१ मे २०२० रोजी झाला. त्यावेळी नताशा सात महिन्यांची गरोदर होती. ३० जुलै रोजी तिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. प्रारंभीचा काळ वगळता या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे अखेर दोघे घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत आल्याची चर्च आहे. नताशाने आपल्या इन्स्टा हॅंडलवरून पांड्या हे नाव काढून टाकल्यावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने वेग घेतला. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये अनेकदा मालमत्तेचा प्रश्न अडकतो. हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर या प्रकरणातही संपत्तीचा मुद्दा कळीचा ठरू शकतो. हार्दिकनं खरोखरच आपली संपत्ती आईच्या नावावर घेतली असेल तर नताशाला त्याच्या संपत्तीतलं काहीच मिळणार नाही. अशाप्रकारे आईच्या नावावर मालमत्ता असणं, हे हार्दिकसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतं.

हार्दिक कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. मुंबईची टीम त्याला एका हंगामासाठी १५ कोटी रुपये पगार देते. हार्दिक भारतीय संघाचा करारबद्ध खेळाडू आहे. याद्वारेदेखील तो कमाई करतो. तसेच जाहिरातींच्या माध्यमातूनही त्याची कोट्यवधींची कमाई होते.

हार्दिकचा हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. तसेच युजर्सही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “हार्दिकची एकूण संपत्ती १६५ कोटीच्या घरात आहे. नताशा घटस्फोटाची मागणी करीत असल्याने त्याला काही रक्कम द्यावीच लागेल. आपल्या समाजात पुरुषांसाठीचे नियम नेहमीप्रमाणेच कडक आहेत.”

हार्दिकने त्याची मालमत्ता त्याच्या आईच्या नावावर ठेवली. कारण- तो गुजराती विचारसरणीचा आहे, अशी  प्रतिक्रया हार्दिकच्या एका फॅनने व्यक्त केली आहे.  आणखी एका युजरने लिहिले, “भाईने आयुष्यभर फक्त ७० टक्के संपत्ती आपल्या पत्नीला देण्यासाठी काम केले, जी पत्नी त्याला लग्नानंतर केवळ चार वर्षांनी सोडून जात आहे. ही चर्चा ऐकली तेव्हापासून हा व्हिडीओ माझ्या मनात घोळत होता.”  एका युझरने असा विवाह आणि घटस्फोटाचा समाजावर खूप वाईट परिणाम होत असल्याची टिप्पणी केली आहे.

हार्दिक व्हीडीओत नेमके काय म्हणाला?

हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिकच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ २०१७ मधील आहे. यामध्ये हार्दिक म्हणतो की, “माझ्या सर्व संपत्तीमध्ये माझी आई हिस्सेदार आहे. माझ्या वडिलांच्या बँक खात्यात, भावाच्या खात्यात आणि माझ्या खात्यात आई हिस्सेदार आहे… सर्व काही तिच्या नावावर आहे. गाडीपासून घरापर्यंत सर्व काही आईच्या नावावर आहे.माझ्या वडिलांच्या खात्यात आईचं नाव आहे. माझ्या भावाच्या खात्यातही आईचं नाव आहे. सर्व काही तिच्या नावावर आहे. माझी कार, माझं घर आणि इतर सर्व काही. मी ते माझ्या नावावर घेणार नाही. पुढे जाऊन मला माझा ५० टक्के वाटा कोणालाच द्यायचा नाही. मला काहीही झालं तरी माझे ५० टक्के जाणार नाही.”

कोणीतरी रस्त्यावर येणार आहे : नताशा

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान नताशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीचीही चर्चा होत आहे.  नताशानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. तिनं स्टोरीमध्ये एक छायाचित्र शेअर केलं आहे. यामध्ये वाहतुकीच्या नियमांशी संबंधित  चिन्हे दिसत आहेत. नताशानं फोटोसोबत एक खास कॅप्शनही लिहिलं.न्यात ती म्हणते, ‘‘कोणीतरी रस्त्यावर येणार आहे.” नताशानं शेअर केलेली ही स्टोरी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या आणि तिच्यामधील संपत्तीच्या विभाजनाशी जोडली जात आहे.

हार्दिक  आणि नताशा यांचा २०२० मध्ये विवाह झाला. मात्र  लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर दोघे घटस्फोट घेणार असल्याने ते चर्चेचा विषय बनले आहेत. नताशन्पूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या प्रोफाइलमध्ये पांड्या आडनाव लिहायची. परंतु आता तिनं हे आडनाव काढून टाकलं आहे. याशिवाय तिनं हार्दिकसोबतचे सर्व लेटेस्ट फोटोही काढून टाकले आहेत. नताशानं हार्दिकचे फक्त तेच फोटो ठेवले आहेत, ज्यामध्ये त्यांच्यासोबत  मुलगा अगस्त्य आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story