Riteish deshmukh : 'मुलांना चांगल्यासोबतच वाईटाचीही कल्पना द्यायला हवी'

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी व अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते चांगलेच चर्चेत असतात. त्यांच्या मुलांवरदेखील ते चांगले संस्कार करत आले आहेत आणि याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. त्यांच्या दोन्ही मुलांचे नेहमीच सर्वांकडून कौतुक होत असते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 01:45 am
'मुलांना चांगल्यासोबतच वाईटाचीही कल्पना द्यायला हवी'

'मुलांना चांगल्यासोबतच वाईटाचीही कल्पना द्यायला हवी'

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी व अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते चांगलेच चर्चेत असतात. त्यांच्या मुलांवरदेखील ते चांगले संस्कार करत आले आहेत आणि याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. त्यांच्या दोन्ही मुलांचे नेहमीच सर्वांकडून कौतुक होत असते.

रितेश आणि जिनिलीया नुकतेच करीना कपूरच्या चॅट शो ‘व्हॉट वूमन वॉन्ट’मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. तसेच, मुलांना वाढवताना त्यांच्या बाबतीत त्या दोघांचे विचार काय असतात हेही त्यांनी शेअर केले. याच दरम्यान त्यांच्या मुलांनी कधी अपशब्द वापरला, तर रितेश आणि जिनिलीया कसे रिॲक्ट करतील हे त्यांनी सांगितले आहे.

रितेश म्हणाला, “वाईट शब्द कोणते हे मुलांना माहीत असणे आवश्यक आहे असे मला वाटते. जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा ते नवनवीन गोष्टी शिकत असतात, पण ते काय बोलतात याचे त्यांना भान असणे महत्त्वाचे आहे. त्या शब्दांचे अर्थ काय हे त्यांना त्यांच्या वयानुसार सांगणे ही पालक म्हणून आमची जबाबदारी आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही या कुठल्याही गोष्टीबद्दल आमच्या पालकांशी कधीही चर्चा केली नाही. आमच्या वेळी आम्ही मित्र-मैत्रिणींकडून हे सगळं जाणून घ्यायचो, पण आता काळ बदलला आहे. काही गोष्टी तुम्ही मुलांपासून लपवू शकत नाहीत.”

जिनिलीया म्हणाली, “मुलांच्या जडणघडणीत आपला सहभाग असणे हे कोणत्याही पालकाला आवडते. जर माझ्या मुलांनी मला काही चांगल्या आणि वाईट शब्दांचे अर्थ विचारले तर, त्या वाईट शब्दांचे अर्थ तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज नाही, असे मुलांना सांगण्याच्या ऐवजी या शब्दांचे अर्थ असे असे आहेत पण हे शब्द वापरणे चुकीचे आहे असे आम्ही त्यांना सांगतो.” रितेश आणि जिनिलीयाचे हे बोलणे सध्या खूप चर्चेत आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story