'सीए टॉपर' सीरिजवर अश्लीलतेचा शिक्का !

'नेटफ्लिक्स'ची आगामी वेब सीरिज 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर' प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरून निर्मात्यांवर टीका केली जात आहे. या वेब सीरिजला विरोध करणाऱ्यांना 'नेटफ्लिक्स'वरही आगपाखड केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 15 Jul 2024
  • 03:10 pm
Entertainment news,  CA Topper, web series, netflix, romance, controversy before release, obscenity

संग्रहित छायाचित्र

'नेटफ्लिक्स'ची आगामी वेब सीरिज 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर' प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरून निर्मात्यांवर टीका केली जात आहे. या वेब सीरिजला विरोध करणाऱ्यांना 'नेटफ्लिक्स'वरही आगपाखड केली आहे. या वेब सीरिजमध्ये चार्टड अकाऊटंट्सला नकारात्मक पद्धतीने चित्रीत करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या मालिकेमध्ये एक अकाऊंटंट गुन्हेगारी विश्वात कशाप्रकारे गुंतत जातो हे दाखवण्यात आले आहे.

'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर'चा ट्रेलर ९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये थेट प्रमुख भूमिकेतील व्यक्तिरेखा चार्टड अकाउंटंट असल्याचे दाखवण्यात आले असून त्यांची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली नाही. यामध्ये मान कौलने साकारलेला चार्टड अकाउंटंट हा सर्वसामान्यांप्रमाणे निरस आयुष्य जगत असतो असे दाखवण्यात आले आहे. आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी तो शरीरविक्रेय करणारा पुरुष म्हणजेच जिगेलो म्हणून काम करू लागतो. हा एक प्रकारचा क्राइम कॉमेडी- ड्रामा आहे. यामध्ये बरीच बोल्ड दृश्य असतील असा चाहत्यांचा अंदाज असून ट्रेलरमध्ये त्याचेच संकेत मिळत आहेत. या चित्रपटामध्ये तिलोत्तमा शोमने प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. दरम्यान  ट्रेलरवरून ही कलाकृती अश्लील असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मी नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी वेब सीरिजचा विरोध करतोय. मी नेटफ्लिक्स इंडिया विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ही वेब सीरिज काढून टाकावी. #boycott_CA_Topper मी सर्वांना विनंती करेन की हे रिपोस्ट करावे, असे एका यूझरने या वेब सीरिजला विरोध करताना म्हटले आहे. 'सीए टॉपर' नाव ठेवले नसते तरी चालले असते. सीएशी संबंधित काही कंटेट यामध्ये आहे असे वाटत तर नाही, असे अन्य एकाने म्हटले आहे.

एक चार्टड अकाऊटंट म्हणून मी या ट्रेलरमधील अश्लीलतेमुळे फार दुखावलो आहे. यामधून या प्रोफेशनचा अपमान केला जात आहे. मी ही वेब सीरिज प्रदर्शित करण्याबद्दल पुन्हा विचार करावा असे सुचवेल. या प्रकरणामध्ये चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने तातडीने कारवाई करून या अवमानाविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही एकाने केली आहे. तर समर्थन करणाऱ्यांपैकी एकाने, खुल्या मनाने याकडे पाहावे. यामधून तुमचे प्रोफेशन प्रमोट होईल. तुम्ही जॉली एलएलबी, डॉक्टर जी पाहिला आणि एन्जॉय केला. त्याचप्रमाणे हा सुद्धा पाहा, असे म्हटले आहे.

कधी प्रदर्शित होणार?
या वादावर निर्मात्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अम्रीत राज गुप्ता आणि पुनित कृष्णा यांनी केले आहे. या वेब सीरिजमध्ये श्वेता बासू प्रसाद, शुभ्रज्योती भरत, फैजल मलिक, जितीन गुलाटी आणि इतर कलाकार आहेत. ही वेब सीरिज १८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story