सारा-अनन्याचा दोहामध्ये जलवा

सारा अली खान आणि अनन्या पांडे या अभिनेत्री जोडीचे बॉलीवूडमध्ये नेहमी कौतुक होत असते. दोघींच्या चित्रपटांची निवड आणि अभिनय कौशल्याची नेहमी तारीफ होते. दोघीही सोशल मीडियावर सतत ॲॅक्टीव्ह असतात. दोघीपैकी एकीने इन्स्टाग्रामवर काही टाकले की त्याला प्रतिसाद मिळत नाही असे होत नाही. त्यांना मिळणारा प्रतिसादही असा दणदणीत असतो की, सोशल मिडीयावर जान येते. आपल्या जीवनात हरघडी काय चालले आहे यांची माहिती दोघीही देत असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Feb 2023
  • 01:33 pm
सारा-अनन्याचा दोहामध्ये जलवा

सारा-अनन्याचा दोहामध्ये जलवा

सारा अली खान आणि अनन्या पांडे या अभिनेत्री जोडीचे बॉलीवूडमध्ये नेहमी कौतुक होत असते. दोघींच्या चित्रपटांची निवड आणि अभिनय कौशल्याची नेहमी तारीफ होते. दोघीही सोशल मीडियावर सतत ॲॅक्टीव्ह असतात. दोघीपैकी एकीने इन्स्टाग्रामवर काही टाकले की त्याला प्रतिसाद मिळत नाही असे होत नाही. त्यांना मिळणारा प्रतिसादही असा दणदणीत असतो की, सोशल मिडीयावर जान येते. आपल्या जीवनात हरघडी काय चालले आहे यांची माहिती दोघीही देत असतात.  

दोहा येथे एका कार्यक्रमात दोन्ही अभिनेत्री एकत्र आल्या होत्या आणि दोघींनी तेथील कार्यक्रम फूल्ल एंजॉय केल्याचे दिसते. कतारमध्ये सारा आणि अनन्याने खूप धमाल, मजा-मस्ती केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत त्यांनी दोहात केलेल्या जलव्याचे दर्शन घडते. एका फोटोत सारा अनन्याचा मेकअप करताना दिसत असून अन्य ठिकाणी त्या पोज देत असल्याचे दिसते. दोघी हव्या त्या पोज देत असल्याने फोटोग्राफरही आनंदी होते. दोन्ही अभिनेत्री त्यांच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. दोहामध्येही त्यांनी केलेल्या फॅशनची चर्चा झाली नसती तरच नवल.

अनन्याने हल्ली एक नवा फंडा चालू केल्याचे दिसते. अलीकडच्या अनेक पोस्टमध्ये तीन पांढऱ्या रंगाचे ड्रेस अधिक वेळा घातल्याचे दिसते. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे आणि प्रभावी दिसते असे अनेकजण मानतात. याचा अनन्यावर भलता प्रभाव पडल्याचे दिसत असून हल्ली ती पांढऱ्या ड्रेसमध्ये वावरताना पाहायला मिळते.

अनन्याने दोहातही पांढरा ड्रेस घातल्याचे आणि त्यात ती अधिकच सुंदर दिसत होती. या शिवाय तीने गोल्डन कलरचे स्टायलीश शूज वापरले असून केस खुले सोडल्याने तिचे व्यक्तिमत्त्व अधिकच उठावदार दिसते. साराला फॉलो करणाऱ्यांना माहित आहे की तिला इथनिक ड्रेस जास्त आवडतात आणि तिला ते खुलूनही दिसतात. बहुतेक कार्यक्रमात तिची इथनिक ड्रेसची किंवा रंगाची आवड दिसून आली आहे. दोहात तिने शरारा घातल्याचे दिसून आले. त्यासोबत तिने घातलेली मॅचिंग व्हेलवेट रंगाची बेलबॉटम तिला अधिक उठावदार बनवत होती. कुर्ता कॉलरवर गुलाबी रंगाची नक्षी उठून दिसत होती. तीने सिल्हर रंगाचे हाय हिल घातले होते. दोघींनी एकच फोटो इन्सटाग्रामवर शेअर केला असून साराने केलेला कमीत कमी मेकअप नजरेत भरणारा आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story